fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

रमामाता महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : सावित्री – रमाई यांच्या वेशभूषा साकारत रमामाता महिला मंडळाच्या वतीने “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी सांस्कृतिक भवन येथे आयोजित या कार्यक्रमात महिलांचे व लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक वेशभूषा, गाणी सादर करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे मंडळाच्या अध्यक्षा सुशीला कदम व सेक्रेटरी रेखा चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक सुमन बहुले यांनी केले. विद्या गडकरी यांनी स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमात रमामाता महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी समाजातील कर्तृत्ववान आदर्श महिला नेतृत्वांच्या पारंपारिक वेशभूषा सादर केल्या. यामध्ये शोभा गायकवाड (सावित्रीबाई फुले), सुरेखा भोसले (राजमाता जिजाऊ), सुमन बहुले (माता रमाबाई आंबेडकर), शशिकला चाबुकस्वार (सिंधुताई सपकाळ) यांनी सहभाग घेतला. अल्फिया मडकी या महाविद्यालयीन विद्यार्थीनीने “मी सावित्रीबाई फुले बोलतेय” हा नाट्यप्रयोग सादर केला. मीना सोनवणे यांनी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. माजी अध्यक्ष सुशीला जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्या गडकरी व अनिता जांगडे यांनी तर योगिनी भोसले यांनी आभार मानले. रमामाता महिला मंडळाचा वतीने आयोजित या कार्यक्रमात स्थानिक महिला व युवतींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading