कदाचित मलिक यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून दाऊदचा दबाव असेल – चंद्रकांत पाटील
मुंबई: नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी उद्या आमचा मुंबईत मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी उद्याच्या मोर्चाला परवानगी नाही दिली .तरी परवानगी झुगारून मोर्चा काढला जाईल. असं सांगतानाच सरकारला नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावाच लागेल. मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही. त्यांचा राजीनामा न घेण्याबाबत कुणाचा दबाव होता का? कदाचित मलिक यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून दाऊदचा दबाव असेल असा माझा अंदाज आहे. असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
मी जेवढं उद्धव ठाकरेंना ओळखतो त्यानुसार त्यांनाही मलिक यांचा राजीनामा घ्यायचा असेल. पण त्यांच्यावर दबाव आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. काहीही झाले तरी उद्या भाजपचा मोर्चा निघणारच. परवानगी मिळो अथवा न मिळो. मोर्चा काढणारच, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले.युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी आधीच म्हणालो होतो.काहीजण सुपात आहेत. काही जण जात्यात आहेत .अशा सर्वांवर कारवाई होणार आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं.
