जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाडेश्वर कट्टा वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पुणे : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाडेश्वर कट्टा वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रम माजी महापौर अंकुश काकडे, मा श्रीकांत शिरोळे, डॉ सतीश देसाई यांनी आयोजित केला होता यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे आणि मा नायब तहसीलदार तृप्ती कोलते, डी.सी.पी.प्रियांका नारनवरे, डी.सी.पी.पूर्णिमा गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगिता तिवारी,डायिटिशन चितळे उपस्थित होते

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या आज सावित्रीबाई फुले घरोघरी आहेत पण ज्योतिबा यांचा शोध जारी आहे त्यामुळे महिला दीन साजरा होईल व महिलांचा सन्मान राहील तसेच आज प्रत्येक महिला मुली यांनी लडकी हूॅं लड सकती हूॅं हे ध्येय लक्षात घेऊन काम केले पाहिजे असे सांगून त्यांनी यावेळी महिला धोरण संबंधी माहिती सांगितली याप्रसंगी महिला सक्षमीकरण महिलांचा राजकारणात सहभाग याविषयी चर्चा झाली माजी महापौर अंकुश काकडे, मा श्रीकांत शिरोळे डॉ सतीश देसाई रवि चौधरी, सुकृत करंदीकर आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा श्रीमती संगिता तिवारी उपस्थित होते यानंतर अल्पोपहार होवून कार्यक्रमाची सांगता झाली. 

Leave a Reply

%d bloggers like this: