Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

धार पवार भगिनींकरीता पालकत्वाची दिशा व स्त्री आरोग्याविषयी मार्गदर्शन

पुणे : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे महिला दिनानिमित्त धार पवार भगिनींकरीता स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर येथील श्री रोकडोबा मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात पालकत्वाची दिशा व स्त्री आरोग्याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ समन्वयक सुभाष पवार, गजानन पवार, विनित पवार, राजेश पवार, स्मिता पवार, सुनिल पवार,डॉ.राजाराम पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार, सुशील पवार, निलेश पवार, सिद्धांत नातू आदी उपस्थित होते. उमेद केअर सेंटरच्या डॉ.रंजना पवार व रेणुका स्वरुप प्रशालेतील प्रा. प्रज्ञा पवार या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. शिवजयंती आॅनलाईन स्पर्धेतील आश्लेषा पवार, रावी पवार, मार्तंड पवार, श्लोक पवार, प्रथमेश पवार देशमुख, शिवाजी पवार, भाविका पवार या विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.

किकबाँक्सीग मधे १११ मेडल मिळविणा-या वैदेही पवार हिचा सत्कार देखील करण्यात आला. महिलांकरीता लंगडी, संगीतखुर्ची, चमचा लिंबू, बॉल बादली मधे टाकणे, लगोरी असे विविध खेळ आयोजित करण्यात आले. प्रतिष्ठानच्या पुणे शहर संपर्क प्रमुख स्मिता पवार, विजया पवार ,अंजली पवार ,योगीनी पवार ,सोनम वैद्य , पूनम वैद्य , विद्या पवार, माया पवार, कल्याणी पवार ,सारीका पवार, वैशाली पवार ,वर्षा पवार, चेतना पवार ,शरमिष्टा पवार ,लता पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading