कलाद्वयी पुणेतर्फे शनिवारी ‘स्वरकीर्ती’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : स्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार यांना आदरांजली वाहण्यासाठी कलाद्वयी, पुणेतर्फे ‘स्वरकीर्ती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिलेदार यांनी सादर केलेल्या विविध नायिकांची पदे दृकश्राव्य माध्यमातून या कार्यक्रमात दाखविली जाणार आहेत.

‘स्वरकीर्ती’ हा कार्यक्रम शनिवार, दि. 12 मार्च रोजी सायंकाळी 6:00 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. कीर्ती शिलेदार यांचा सहवास लाभलेले रंगभूमीवरील कलाकार आणि संगतकार त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. संजय देशपांडे, संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, निनाद जाधव, अस्मिता चिंचाळकर, संजय गोसावी, वर्षा जोगळेकर यांचा यात सहभाग आहे. कीर्ती शिलेदार यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची झलक या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. संगीत नाट्यप्रेमी रसिकांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कलाद्वयी, पुणेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: