Saturday, November 21, 2026
Latest NewsSports

आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत  दुहेरीत साई संहिता चमर्थी व सोहा सादिक यांना विजेतेपद 

 
नागपुर : नागपुर जिल्हा हार्ड कोर्ट टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली, जर्मनीच्या एमिली सेबोल्ड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत भारताच्या साई संहिता चमर्थी व सोहा सादिक या जोडीने विजेतेपद संपादन केले. 
 
नागपूर,रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत रशियाच्या दुसऱ्या मानांकित ऍना उरकेचा 6-0, 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना  57 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये सहजाने उत्कृष्ट खेळ ऍनाला फारशी संधी दिली नाही व हा सेट 6-0 असा सहज जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्येदेखील सहजाने वरचढ खेळ करत 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली. पण ऍनाला उजव्या हाताला एल्बो त्रास होऊ लागल्याने तिने सामन्यातून माघार घेतली.
 
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित एमिली सेबोल्ड हिने अव्वल मानांकित झील देसाईचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1तास 53मिनिटे चालला. 
 
दुहेरीत अंतिम फेरीत साई संहिता चमर्थी व सोहा सादिक या जोडीने श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती व समा सात्विका यांचा 3-6, 6-4, 13-11 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला करंडक व 10डब्लूटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नगरसेविका डॉ. प्रणिती फुके, आर्यन पंप्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, एमएसएलटीएचे खजिनदार व स्पर्धेचे संचालक सुधीर भिवापूरकर, विजय नायडू, शिव मोर आणि अली पंजवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: उपांत्य फेरी: 
सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि.ऍना उरके(रशिया)[2]6-0, 3-0 सामना सोडून दिला;
एमिली सेबोल्ड(जर्मनी)[3] वि.वि.झील देसाई(भारत)[1] 6-4, 6-2;  
 
दुहेरी: अंतिम फेरी:
साई संहिता चमर्थी(भारत)/सोहा सादिक(भारत)वि.वि.श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत)/समा सात्विका(भारत)3-6, 6-4, 13-11.  

Leave a Reply