fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आम्ही मुक आंदोलन करणार – प्रशांत जगताप

पुणे : युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी न लावता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहरात अर्धवट झालेल्या विकास कामांच्या उदघटनाला येत आहेत. पंतप्रधानांनी फक्त सात किलोमीटरच्या मेट्रो मार्गासाठी नाहीतर एकतीस किलोमीटरच्या मेट्रो मार्ग उदघाटनासाठी यायला हवं होतं. 
परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहरात मेट्रो प्रकलपाच्या उदघाटनाला  येत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला आमचा कडाडून विरोध आहे.  आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुक आंदोलन करणार, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

मेट्रो प्रकल्पाचे उडघटनाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ हे शासनाचे तसेच महापालिकेचे शेअर होल्डर म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची बाहेर एक आणि महापालिकेत दुसरीच भूमिका असते. त्यांच्या घोषणांना आपण गांभीर्याने घेत नाही.त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक त्यांचेच आदेश पाळत नाहीत.हे वारंवार सिद्ध झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रशांत जगताप यांच्यावर केली होती. त्यातच शहरात त्यावर आज जगदीश मुळीक हे पोस्टर बॉय आहेत. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जगदीश मुळीक यांच्यावर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading