राज्यातील 14 जिल्हे Unlock; राज्यसरकारने जारी केली नवीन नियमावली
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसारली असून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील 14 जिल्हे हे येत्या 4 मारचपासून अनलॉक करण्यात येणार आहेत. या जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहे. मात्र, इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट ही कायम राहणार आहे.
Unlock होणारे जिल्हे ?
- पुणे
- नागपूर
- सातारा
- कोल्हापूर
- मुंबई शहर
- मुंबई उपनगर
- रायगड
- भंडारा
- सिंधुदुर्ग
- वर्धा
- रत्नागिरी
- सांगली
- गोंदिया
- चंद्रपूर
