पंतप्रधानांना काँग्रेस काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार – रमेश बागवे
पुणे : पंतप्रधान येत्या 6 तारखेला पुणे दोऱ्यावर येत आहे. मोदींनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्राचा अवमान केला आहे. काँग्रेसमुळे कोरोना पसरला आहे, असे वक्त्व्य केले होते. त्यामुळे आम्ही मोदींना काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार असल्याची माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, कमाल व्यवहारे, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते. यावेळी रमेश बागवे म्हणाले, प्रवीण दरेकर खोटे बोलत असतात त्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. विकास काहीच केला नाही. समान पाणी योजना खर्च केला. विशिष्ट कंपनीला काम देण्यासाठी जायकाची निवड केली. मेट्रोची मूळ कल्पना काँग्रेसची आहे. भाजपने केंद्रात आणि शहरात बहुमत असूनही एकही विकास काम केल नाही. मोदींचा दौरा हा राजकीयच आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर रमेश बागवे यांनी केली.
तसेच यावेळी रमेश बागवे यांनी येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष हासर्व जागा जिंकून येईल, असा दावा केला.
