fbpx
Wednesday, May 8, 2024
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेत प्रवेशासाठी गेटपास अनिवार्य

पुणे : महापालिकेत भाजप नेते किरिट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिकेची सुरक्षेचे पितळ उघडे पडले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य इमारतीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीत टपास शिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी आज दिले आहेत.

तसेच महापालिका आवारात आंदोलन करता येणार नाही, नगरसेवक व माजी नगरसेवक यांना नगर सचिव विभागाने ओळखपत्र द्यावेत अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या प्रत्येक प्रवेश द्वारावर सुरक्षा व्यवस्था असली तरी त्याचा धाक नाही अशी अवस्था आहे. महापालिकेला सुट्टी असतानाही किरिट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर काही सुरक्षारक्षकांवर कारवाई झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य इमारतीच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली जात असताना आज महापालिका आयुक्तांनी आदेश काढले. महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याची ओळख पटवून द्यावी लागेल, त्याची नोंदही ठेवली जाणार आहे.

महापालिकेने काढलेले नियम

  • महापालिकेच्या आवारात कोणतेही आंदोलन व निदर्शने करता येणार नाहीत
  • महापालिकेला सुट्टी असताना संबंधित खात्याच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही
  • सुट्टीच्या दिवशी राजकीय कार्यक्रम असल्यास त्याबाबत प्रशासनाला पूर्वसूचना देणे आवश्‍यक
  • मनपा कर्मचारी, अधिकाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे
  • नगरसेवक, माजी नगरसेवक, स्वीकृत सभासद यांना नगरसचिव विभागाने ओळखपत्र द्यावेत
  • मुख्य इमारतीमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना ओळखपत्र दाखवावे लागेल
  • महापालिकेत प्रवेश करताना गेटपास घ्यावा लागेल
  • कामात कुचराई करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर विभागप्रमुखांनी त्वरित कारवाई करावी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading