सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार – सभागृह नेते गणेश बिडकर
पुणे : सभागृह नेते गणेश बिडकर यांचे पद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे भाजपला एक प्रकारे मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या विषयावर गणेश बिडकर यांना विचारलं असता त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो असे म्हटंले आहे. तसेच न्यायालयाने मला चौदा दिवसांचा अपील करण्यासाठी वेळ दिला असून मी मी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ही स्पष्ट केले.
पुढे बोलताना गणेश बिडकर म्हणाले, न्यायालयाची ऑर्डर मला अद्याप मिळालेली आहे. न्यायालयाने अपिल करण्यासाठी मला 2 आठवड्यांची मुदत दिली असून मी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय होईपर्यंत सभागृह नेता म्हणून स्मार्ट सिटी कंपनी आणि अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ट्रस्ट च्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे ही गणेश बिडकर यांनी स्पष्ट केले.
