Thursday, August 13, 2026
Latest NewsPUNE

सभागृह नेते पदासाठी गणेश बिडकर अपात्र – उच्च न्यायालय

बिडकर यांच्या कार्यकाळातील निर्णय रद्द करावेत – रवींद्र धंगेकर  

पुणे : पुणे महापालिकेमध्ये बहुमतात असलेल्या व 99 नगरसेवकांची ताकद असताना भाजपने एका स्वीकृत नगरसेवकाला सभागृह नेतेपद दिले आहे. ही नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप करीत अपक्ष नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल  केली होती. 20 सप्टेंबर 2021 रोजी अंतिम निर्णयासाठी ही याचिका होणार होती. परंतु ती अद्यापपर्यंत प्रलंबित होती. या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली असून न्यायालयाने गणेश बिडकर यांना सभागृह नेतेपदी अपात्र ठरविले असल्याचा निकाल दिला आहे, अशी माहिती रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली .

या पत्रकार परिषदेला रवींद्र धंगेकर यांचे वकील ॲड. कपिल राठोड, काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी अध्यक्ष मोहन जोशी, रवींद्र धंगेकर यांचे वकील, नगरसेवक अविनाश बागवे,  नगरसेवक अभय छाजेड हे उपस्थित होते.

रवींद्र धंगेकर म्हणाले, पुणे महानगरपालिकेचे सभागृहनेते गणेश बिडकर यांचं सभागृह नेतेपद हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवले असून गणेश बिडकर यांच्या कार्यकाळात झालेले निर्णय देखील आता रद्द करावेत, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading