fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsNATIONALTOP NEWS

दुखःद बातमी  : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये एक भारतीय विदयार्थी मृत्युमुखी

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ अनेक देशांना पोहचत आहे. आज या युद्ध भूमीवरून भारतासाठी अत्यंत दुखःद बातमी आली आहे. युक्रेनच्या खारकिव्हमध्ये रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यात युक्रेन येथे  शिक्षणासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय या मृतक विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेला विद्यार्थी हा कर्नाटक मधला असून त्याचे नाव नवीन शेखराप्पा आहे. नवीन हा खारकिव्ह मेडिकल युनिव्हर्सिटी मधील मेडीकलच्या चौथ्या वर्षात विद्यार्थी  होता. आज सकाळी तो खारकिव्ह येथील गव्हर्नर हॉल येथे काही खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी बाहेर पडला असता रशियन सैन्याच्या गोळीबारात मृत्यमुखी पडला.

दरम्यान, युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु झाल्यापासून या रणभूमीत वास्तव्यास असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तिथे अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. सुरुवातीला हे युद्ध संपेल असं वाटत होतं. पण आता हे युद्ध आणखी चिघळताना दिसत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading