Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

दिलासादायक : आज सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहरात कोरोनामुळे एकही मृत्यूची नोंद नाही   

पुणे :  पुणे शहरामध्ये तिसऱ्या लाट ओसरत असून कोरोना रुग्णांचे प्रमाणही कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 120 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 199रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे शहरात आजपर्यंतची कोरोना रुग्ण संख्या 66 लाख 5 हजार 31 इतकी झाली आहे. यापैकी 6 5 लाख 1 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9345 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 66 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 64 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2271 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading