Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये बदल होणार

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर सुनावणी झाल्यानंतर आता त्यानुसार आवश्‍यक त्या ठिकाणी बदल करण्यासाठी ‘यशदा’चे महासंचालक एस. चोकलिंगम यांच्या समितीची खलबते सुरू झाली आहेत. यामध्ये शिवाजीनगर, कोथरूड व हडपसरमध्ये बदल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभागरचनेवर साडेतीन हजार हरकती व सूचना आल्या. त्यावर २४ व २५ फेब्रुवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये बाणेर-सूस म्हाळुंगे हा प्रभाग क्रमांक १३ दोन सदस्यांचा करण्यात आला. ही रचना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा आरोप सुरवातीपासूनच होत असून, याचे पडसाद सुनावणीमध्ये देखील उमटले आहेत. तसेच हडपसर भागातील सय्यदनगर, रामटेकडी येथूनही मोठ्याप्रमाणात हरकती आल्या आहेत. सुनावणीमध्येही त्याचे पडसाद उमटले होते. सुनावणीनंतर निवडणूक आयोगाला बदलांच्या शिफारशींसह त्याचा अहवाल सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यामध्ये सुमारे १५ ते २० महत्त्वाचे बदल करण्याची शिफारस केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading