Saturday, June 20, 2026
PUNE

केंद्रीय वक्फ कौन्सिल सदस्य वासिम राहत अली  खान यांची आझम कॅम्पस ला भेट

पुणे, दि. २७ – केंद्रीय वक्फ कौन्सिल(नवी दिल्ली)चे सदस्य तसेच वक्फ डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष वासिम राहतअली खान यांची आझम कॅम्पस ला भेट दिली. या भेटीत त्यांनी आझम कॅम्पसच्या विद्यार्थ्यांची संगणक प्रशिक्षण,दुरुस्ती,रोबोटिक्स,माहिती तंत्रज्ञान विषयक प्रगतीची प्रात्यक्षिके पाहिली. आझम कॅम्पस मधील या संगणक प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली.’देशात आझम कॅम्पसने शैक्षणिक आणि संगणकीय प्रशिक्षणात आदर्श उभा केला असून केंद्राकडून कोणतीही मदत याकामी लागल्यास सहकार्य केले जाईल’.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी स्वागत केले. यावेळी हाजी अराफत शेख,तन्वीर नासिर जौद,इकबाल अन्सारी तसेच विभागप्रमुख,शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading