Monday, August 31, 2026
PUNE

फॉग मशिनच्या सहाय्याने अखिल मंडई मंडळात सॅनिटायजेशन

पुणे : अखिल मंडई मंडळाचा १२७ वा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या आरोग्याची काळजी घेत साजरा केला जात आहे. प्रत्येक २ तासांनी फॉग मशीनच्या सहाय्याने पूर्ण मंदिर सॅनिटाईज केले केले जाते. त्याशिवाय कार्यकर्ते आॅकिसमीटर, आणि थर्मामीटरच्या सहाय्याने प्रत्येकाची तपासणी करतात. मंडळात येणाºया प्रत्येकासाठी मास्क बंधनकारक आहे.
अण्णा थोरात म्हणाले, मंदिर आणि परिसरात कोरोनाचा प्रार्दुभाव कोणाला होऊ नये यासाठी संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे. यामध्ये फॉग मशिनने संपूर्ण मंदिर सॅनिटाईज करण्यात येते. मंदिर बंद करुन १५ ते २० मिनिटे सॅनिटायजरचा धूर मशिनच्या सहाय्याने सोडण्यात येतो, ज्यामुळे मूर्तीसह मंदिर सॅनिटाईज होते. मंदिर परिसरात डॉक्टराची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading