fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENT

New show  ‘फनहित मे जारी’

भारती सिंग व कृष्‍णा अभिषेक सुत्रसंचालकाच्‍या भूमिकेत

सोनी सब सादर करत आहे आणखी एक हसवून-हसवून लोटपोट करणाराशर्ट फर्मेट स्‍केच कॉमेडी शो फनहित मे जारी‘.भारती सिंग कृष्‍णा अभिषेक यांचे सुत्रसंचालन असलेला हा शो प्रेक्षकांना मत्रमुग्ध करेल. दोघेही जगभरातील विविध विषयांवर मजेदार विडंबन सादर करतील. २ ते ३ मिनिटांचे किस्‍से२२ ऑगस्‍टपासून फक्‍त सोनी सबवर दर शनिवारी व रविवारी प्रसारित करण्‍यात येतील.

फनहित मे जारी शोमध्‍ये जास्‍मीन भसीन, मुबीन सौदागर, सोनू पाठक व ज्‍योती शर्मायाच्यासह कृष्‍णा व भारती हे कलाकार पाहायला मिळतील. हे सर्व कलाकार दर वीकेण्‍डला नवीन किस्‍स्‍यांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. यामध्‍ये खालील विभागांचा समावेश असेल:

अॅडवेन्‍चर्स ऑफ राजमाता – गतकाळातील शाही राजघराण्‍याचा इतिहास जाणून घ्या.

ची.आय.डी. – कुछ तो गडबड है. आपल्‍याला हे लवकरच समजेल!

कंट्रोल भाई कंट्रोल – उदय भाई व मंजू याना त्‍यांची बहीण संजनाचा अद्वितीय, विलक्षण व देसी स्‍टाइल विनोदी पद्धतीने विवाह करण्‍याचा प्रयत्‍न करताना पाहा.

गोलू हाजीर हो – शाळेतील मुख्‍याध्‍यापक आणि त्‍यांचा अत्‍यंत खोडकर व हट्टी विद्यार्थी गोलू यांच्‍यामधील मूलत: तयार करण्‍यात आलेली स्थिती.

विविध अद्भुत भूमिका साकारत भारती व कृष्‍णासह सर्व कलाकार प्रेक्षकांना संबंधित व सामायिक विषयावर हास्‍याच्‍या राइडवर घेऊन जातील. ते त्‍यांच्‍या अनोख्‍या विनोदी शैलीमध्‍ये त्‍यांचे परफॉर्मन्‍सेस सादर करतील.

भारती सिंग म्‍हणाली,”मला लोकांना हसवायला आवडते आणि फनहित मे जारीसह आम्‍ही आमच्‍या प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करणार आहोत. या शोसाठी सोनी सबसोबत सहयोगी असण्‍याबाबत चांगले वाटत आहे. चॅनेल अस्‍सल कौटुंबिक मनोरंजनासाठी ओळखले जाते. सोनी सबवरील शोज प्रेक्षकांना आनंद देण्‍यासंदर्भात कधीच अयशस्‍वी ठरत नाहीत. फनहित मे जारीसह आमचा हीच गोष्‍ट साध्‍य करण्‍याचा प्रयत्‍न आहे. मला खात्री आहे की, प्रेक्षक आम्‍ही त्‍यांच्‍यासाठी सादर करत असलेल्‍या मनोरंजनाचा आनंद घेतील.

कृष्‍णा अभिषेक म्‍हणाला,”सोनी सब हे असे चॅनेल आहे, जे लहान किंवा वृद्ध व्‍यक्‍ती असो कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून पाहू शकतात.फनहित मे जारी चॅनेलवर सुरू असलेल्‍या काही अद्भुत शोजमध्‍ये सामील होणार आहे. या स्‍केच कॉमेडी शोसह आम्‍ही प्रेक्षकांसाठी अत्‍यंत हास्‍यजनक व सामायिक किस्‍से सादर करत त्‍यांना हसवून-हसवून लोटपोट करू. फनहित मे जारीसह त्‍यांचे वीकेण्‍ड्स मनोरंजनाने भरलेले असतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading