Tuesday, June 16, 2026
PUNE

राखी पोर्णिमेनिमित्त अनोखा उपक्रम ‘7 फुटांची कोरोना योद्धा राखी’

पुणे, दि. 3 – राखी पोर्णिमेनिमित्त गेल्या 4 वर्षांपासून समाजासाठी कार्य करणाऱ्या बांधवांसाठी पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागूल यांच्यावतीने ‘रक्षाबंधनाचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे 5 वे वर्ष आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करणाऱ्या कोरोना योध्याना आपले कर्तव्य बजावून नागरिकांना कोरोनापासून दूर ठेण्यासाठी आपल्या बहिणींकडे जाता आले नाही.अश्या कर्तव्य निष्ठ कोरोना योध्याना ‘कोरोना योद्धा राखी’ बांधण्यात आली.

दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात ” 7 फुटांची राखी” बांधण्यात आली.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी ओवाळणीमध्ये भगिनींना सॅनिटायझेर देऊन याचा वापर करा,सामाजिक अंतर राखा,मास्क वापरा तरच आपण कोरोनावर मात करू शकतो. याचे काटेकोरपणे पालन करा हीच भावाची भेट आहे असे म्हणाले.

त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणारे डॉक्टर,नर्स,सफाई कामगार,अधिकारी व कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा राखी बांधण्यात आली.यावेळी dsi नरेंद्र भालेराव , si सोनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते

वृक्ष जगले तर आपण जगू वृक्षांचे रक्षण करण्याचे व्रत जनमानसात रुजण्यासाठी राजीव गांधी इ लर्निंग स्कूल समोरील झाडांना राखी बांधून सदैव वृक्षवल्लीच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत.
त्याचप्रमाणे भारतीय सीमेवर आपल्या रक्षणार्थ तैनात असलेल्या सैनिकांसाठी पत्ररूपी राख्या पाठवण्यात आल्या व ममता फाउंडेशनमधील एड्सग्रस्त मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात राख्या बांधून सॅनिटायझेर, मास्क व सॅनिटायझेर स्टँड देण्यात आले.

अमित बागूल म्हणाले, समाजासाठी कामे करत असताना आपल्या घरच्यांना वेळ देता येत नाही.त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या जीवनात आनंद भरण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा करत आहोत.यंदा कोरोनामुळे अनेक नागरिकांना रक्षाबंधन करता आले नाही. त्यांनी निराश न होता.नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्यासाठी स्वतः कोरोना योद्धा बना.
यावेळी सागर आरोळे,इम्तियाज तांबोळी,भरत तेलंग,संतोष पवार,बाबासाहेब पोळके,धनंजय कांबळे,इर्शाद शेख,कुणाल आरडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading