Sunday, June 21, 2026
PUNE

डॉक्टर,शासकीय कर्मचारी ,पोलिसांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी

पुणे, दि. ३ – कोरोना काळात जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी ल, पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक, मुकादम, डाॅक्टर व सेवाभावी संस्थांचे सदस्य यांना रक्षाबंधनाचे निमित्ताने भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी राखी बांधुन त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांचा यथोचित सन्मान केला. भाजपचे स्वीकृत सभासद सचिन दांगट यांचे नेतृत्वाखाली वारजे माळवाडी परिसरातील हा उपक्रम यशस्वी झाला .

कार्यक्रमास भारतीय मजदुर संघाचे प्रकाश आळंदकर , वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत,स्टेशनचे कर्मचारी , वारजे वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांचेसह वाहतुक कर्मचारी , पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक ऋतुराज दिक्षीत , सचिन सावंत , मुकादम संतोष बराटे ,रेणुका मोरे , वर्षा पवार , रेश्मा दोशी , सुप्रिया निंबाळकर , अमजद अन्सारी , किरण साबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना,कोवीड १९ या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे . या काळात शासनाने घालुन दिलेले नियम पालन जनतेकडून करून घेण्यासाठी ज्यांनी आपल्या कुटुंबाचा , आपला सगळा वेळ देऊन सेवा केली आहे ,त्यांची कृतज्ञता म्हणून हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती सचिन दांगट यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading