fbpx
Monday, June 17, 2024

Day: August 22, 2020

MAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात सलग तिसऱ्या दिवशी १४ हजारांहून अधिक नवीन पॉझिटिव्ह; २९७ जणांचा मृत्यू

राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Read More
PUNETOP NEWS

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पारंपारिक पद्धतीने प्रतिष्ठापना

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना शनिवारी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली.

Read More
PUNETOP NEWS

मुख्य मंदिरात ‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना साधेपणाने संपन्न

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला

Read More
PUNETOP NEWS

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मंडईच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना

अखिल मंडई मंडळाच्या १२७ वा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

Read More
PUNE

कोरोनाकाळात ‘सक्सेस’फुल आरोग्यसेवा ठरले वरदान

कोरोनाच्या साथीमुळे साधा सर्दी, खोकला झाला, तरी त्यावरील उपचार हजारांच्या घरात जात आहेत. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही. अशावेळी आजार जडला तर काय करायचे, ही चिंता गरिबांना सतावतेय. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील रुपीनगर-विद्यानगर भागात गरीब रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. श्री अग्रसेन क्लिनिक मोफत धर्मादाय दवाखाण्याच्या या ‘सक्सेस’फुल आरोग्यसेवेमुळे परिसरात या मोफत दवाखान्याची वाहवा होत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात छोट्या छोट्या आजारांवर येथे उपचार होत असल्याने या भागातील नागरिकांना दिला मिळाला आहे.

Read More