Tuesday, June 16, 2026
PUNE

कोरोनाकाळात ‘सक्सेस’फुल आरोग्यसेवा ठरले वरदान

पिंपरी-पुणे : कोरोनाच्या साथीमुळे साधा सर्दी, खोकला झाला, तरी त्यावरील उपचार हजारांच्या घरात जात आहेत. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही. अशावेळी आजार जडला तर काय करायचे, ही चिंता गरिबांना सतावतेय. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील रुपीनगर-विद्यानगर भागात गरीब रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. श्री अग्रसेन क्लिनिक मोफत धर्मादाय दवाखाण्याच्या या ‘सक्सेस’फुल आरोग्यसेवेमुळे परिसरात या मोफत दवाखान्याची वाहवा होत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात छोट्या छोट्या आजारांवर येथे उपचार होत असल्याने या भागातील नागरिकांना दिला मिळाला आहे.
औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत ‘सक्सेस लँडमार्क’च्या वतीने श्री अग्रसेन क्लिनिकची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जातात. यामध्ये आरोग्य तपासणी, रक्त लघवी, औषधे या सर्व गोष्टी मोफत आहेत. ऍलोपॅथिकसह होमियोपॅथी उपचारही उपलब्ध आहेत. यासाठी कोणतेही कागदपत्रे मागितली जात नाहीत. दवाखान्यात आल्यावर चिट्ठी काढून रुग्णांवर पुढील उपचार सुरु होतात. डॉ. शीतल, डॉ. निलोफर, डॉ. संतोष यांची तीन-चार डॉक्टरांची टीम येथे कार्यरत आहे. नि:स्वार्थ भावनेने सुरु केलेल्या या आरोग्यसेवेमुळे या भागातील गरीब लोकांची मोठी सोय झाली आहे. सर्दी, खोकला, हिवताप, अंगदुखी, कंबरदुखी आदी दुखण्यांवर मोफत उपचार मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. आर्थिक मागास वर्गातील हे लोक मोठ्या मनाने डॉक्टरांना धन्यवाद देतात.
याविषयी बोलताना सक्सेस लँडमार्कचे चेअरमन देविचंद अगरवाल म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमधील रुपीनगर-विद्यानगर भागात कोणतेही सरकारी रुग्णालय नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत होती. खासगी रुग्णालयातील खर्च या लोकांना परवडणारा नव्हता. त्यामुळे या भागातील लोकांना मोफत आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०१६ रोजी हा दवाखाना सुरु केला. आजोबा लाला किशनलाल अगरवाल यांच्या स्मृतीनिमित्त हे रुग्णालय उभारले आहे. गेल्या चार वर्षात महिन्याला २००० पेक्षा जास्त लोकांवर उपचार होताहेत, ही आनंद देणारी गोष्ट आहे. या भागातील गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, या उद्देशाने सुरु केलेल्या या रुग्णालयामार्फत आणखी सुसज्ज यंत्रणा उभारून मोठ्या आजारांवरही उपचार देण्याचा प्रयत्न आम्ही पुढील काळात करणार आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading