Wednesday, June 10, 2026
MAHARASHTRATOP NEWS

कोरोना – राज्यात सलग तिसऱ्या दिवशी १४ हजारांहून अधिक नवीन पॉझिटिव्ह; २९७ जणांचा मृत्यू

पुण्यात दिवसभरात १५७७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

मुंबई, दि.२२: राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नवीन  रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९  हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १४,४९२ नवीन  रुग्ण आणि नोंद झालेले २९७ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-११३४ (३२), ठाणे- १८५ (२), ठाणे मनपा-१४६ (९), नवी मुंबई मनपा-४२५, कल्याण डोंबिवली मनपा-४२२ (१), उल्हासनगर मनपा-१७ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (२), मीरा भाईंदर मनपा-१४८ (८), पालघर-१७३ (३), वसई-विरार मनपा-१९० (७), रायगड-२४९ (८), पनवेल मनपा-२२६ (२), नाशिक-२२२ (७), नाशिक मनपा-६४१ (३), मालेगाव मनपा-३० (२), अहमदनगर-३३४ (११),अहमदनगर मनपा-२५२ (११), धुळे-३४५ (२), धुळे मनपा-२३५ (३), जळगाव-६३५ (३), जळगाव मनपा-१४३ (३), नंदूरबार-१४९ (२), पुणे- ६५९ (२१), पुणे मनपा-१५८१ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-९८१ (१५), सोलापूर-३८७ (५), सोलापूर मनपा-३५, सातारा-३९५ (६), कोल्हापूर-४०५ (५), कोल्हापूर मनपा-२२८ (३), सांगली-१३८ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५० (८), सिंधुदूर्ग-१४१, रत्नागिरी-८० (५), औरंगाबाद-९५ (३),औरंगाबाद मनपा-१५३, जालना-६० (२), हिंगोली-७८ (२), परभणी-२९, परभणी मनपा-५५, लातूर-९४ (२), लातूर मनपा-२७५ (५), उस्मानाबाद-२६३ (७),बीड,- २६५ (४), नांदेड-६८ (२), नांदेड मनपा-१०० (२), अकोला-५३ (१), अकोला मनपा-१६, अमरावती-१६ (१), अमरावती मनपा-७५ (७), यवतमाळ-३६, बुलढाणा-५१ (१), वाशिम-३३ , नागपूर-१८८, नागपूर मनपा-६९७ (१९), वर्धा-३७ (१), भंडारा-४१ (१), गोंदिया-४५, चंद्रपूर-३५ (१), चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-४, इतर राज्य १५.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ नमुन्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२७ टक्के एवढा आहे.

२२ ॲागस्ट 2020 पुणे अपडेट …….– दिवसभरात १५७७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १४२७ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ४६ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १३ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ८०४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४८८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ८२१७०.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४८७४.
– एकूण मृत्यू -१९५०.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ६५३४६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६८९१.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading