Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRA

कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे; ३९० बळी

पुण्यात दिवसभरात १३९० पॉझिटिव्ह, ३६ मृत्यू

मुंबई, दि.९: राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज  १२ हजार २४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के  एवढे आहे. सध्या १ लाख ४५  हजार ५५८  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज देखील राज्यभरात सर्वाधिक ७८ हजार ७० चाचण्या करण्यात आल्या आहेत,  अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १२,२४८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३९० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०६६ (४८), ठाणे- २४७ (७), ठाणे मनपा-२१४ (३),नवी मुंबई मनपा-३४८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३१९ (१३),उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (२), मीरा भाईंदर मनपा-११७ (१२), पालघर-२२७ (५), वसई-विरार मनपा-२२७ (५), रायगड-२३९ (५), पनवेल मनपा-२०६ (२), नाशिक-१३६ (३), नाशिक मनपा-८०७ (९), मालेगाव मनपा-२९ (२),अहमदनगर-३९९ (१),अहमदनगर मनपा-१९९ (३), धुळे-९५, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२७३ (२४), जळगाव मनपा-५७ (४), नंदूरबार-२६, पुणे- ५१७ (१७), पुणे मनपा-१४३३ (५८), पिंपरी चिंचवड मनपा-१०६६ (२०), सोलापूर-३२७ (७), सोलापूर मनपा-८० (३), सातारा-२५७ (८), कोल्हापूर-३०७ (८), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-६९ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-२४० (६), सिंधुदूर्ग-२७ (२), रत्नागिरी-१०३ (२), औरंगाबाद-१६५ (७), औरंगाबाद मनपा-११५ (२), जालना-११० (१), हिंगोली-३१ (२), परभणी-२१ (४), परभणी मनपा-५३ (३), लातूर-१७८ (८), लातूर मनपा-१०१ (४), उस्मानाबाद-१६१ (१), बीड-२३५ (१), नांदेड-१४१ (३), नांदेड मनपा-१ (२), अकोला-४२, अकोला मनपा-२६, अमरावती-१४, अमरावती मनपा-५४, यवतमाळ-८८ (१०), बुलढाणा-८६ (३), वाशिम-४२, नागपूर-११६ (३), नागपूर मनपा-४८८ (३७), वर्धा-२३ (१), भंडारा-२, गोंदिया-२८ (१), चंद्रपूर-१८, चंद्रपूर मनपा-१३, गडचिरोली-५ (१), इतर राज्य २३.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ लाख २५ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख १५ हजार ३३२ नमुने पॉझिटिव्ह (१८.९१ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.

पुणे अपडेट ९ ॲागस्ट 2020……- दिवसभरात १३९० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १८७९ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ३६ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.१२ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ७२६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ६५९६६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५८१२
– एकूण मृत्यू -१५४०.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ४८६१४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६००८.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading