Saturday, September 19, 2026
Latest NewsSports

‘सीएसआर करंडक’ १३ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेचे ११ एप्रिलपासून आयोजन !!

पुणे : २४ स्पोटर्स तर्फे ‘क्रिकस्टार रायझिंग (सीएसआर) करंडक’ १३ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ एप्रिल ते ८ मे २०२४ या कालावधीत सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि २४ स्पोटर्चे संचालक उदय म्हात्रे यांनी सांगितले की, क्रिकेटचे प्रशिक्षण घेणार्‍या पुण्यातील वेगवेगळ्या क्लब, अ‍ॅकॅडमी यातील मुलांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान वयात मुलांना व्यावसायिक आणि स्पर्धात्मक खेळाचा सराव व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. दिवस-रात्र या वेळात सामने खेळविण्यात येणार असल्याने एक वेगळा अनुभव मुलांना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत पुणे आणि परिसरातील असे एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. पिंक चेंडूवर होणार्‍या या स्पर्धेत एकूण २४ सामने होणार आहेत.
स्पर्धेत आयोजक क्रिकस्टार रायझिंग (सीएसआर) अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी, योगेश क्रिकेट अ‍ॅकॅडमी, स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, टेंभेकर फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि जगदाळे स्पोटर्स फाऊंडेशन हे संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक आणि ३० हजार रूपयांचे रोख पारितोषिक तर, उपविजेत्या संघाला करंडक आणि २० हजार रूपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना करंडक आणि रोख पारितोषिक मिळणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल स्पर्धेत असणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि  क्रिकस्टार रायझिंग (सीएसआर) अ‍ॅकॅडमी या दोन संघांमध्ये रंगणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading