Wednesday, August 5, 2026
Latest NewsPUNE

प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन तीन दिवसीय स्पर्धा पुण्यात

पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस्, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सृजनसभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 8 वा प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विविध गुण्दर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २० ते २२ आॅगस्ट दरम्यान न-हे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व, लोकगीत गायन, वादविवाद, पथनाट्य, छोटा ख्याल गायन, नाटयगीत गायन व एकल तबला वादन या प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

युवा पिढीतील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरीता आयोजित स्पर्धेचे उद््घाटन गुरुवार, दिनांक २० आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. उद््घाटनानंतर वक्तृत्व स्पर्धा होणार असून समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय संत परंपरा आणि समरसता, महाभारतातील स्त्रिया : व्यक्तित्व व कर्तृत्व असे विषय आहेत. तर, लोकगीत गायन स्पर्धेत अभंग, भारुड, पोवाडा सादरीकरण देखील याच दिवशी होणार आहे. तसेच स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे निबंधलेखन स्पर्धा व कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा ही १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली आहे.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, वादविवाद व पथनाटय स्पर्धा शुक्रवार, दिनांक २१ आॅगस्ट रोजी सकाळी १० पासून सुरु होणार आहेत. वादविवाद स्पर्धेकरीता आर्टिफिशियल इंटेलिजन्स – मानवाचा मित्र की प्रतिस्पर्धी?, राजकारणात महत्व कशाला? पक्षनिष्ठा की व्यक्तिगत प्रगती? हे विषय असणार आहेत. तसेच पथनाटय स्पर्धेकरीता से नो टू ड्रग्ज घोषणेपलीकडील कृती या विषयावर सादरीकरण करण्याची मुभा स्पर्धकांना असणार आहे. तसेच, शनिवार, दिनांक २२ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता छोटा ख्याल गायन, नाटयगीत गायन व एकल तबला वादन स्पर्धा होईल.

सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला १५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकाला ७ हजार ७७७ रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविणा-या रुपये ११११ व चषक प्रदान करण्यात येणार आहे. एकूण २ लाख ५० हजारहून अधिक रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेमध्ये पुण्यासह कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरांतील संघांनी सहभागी होणार असून नोंदणी सुरु आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, दिनांक २६ आॅगस्ट रोजी महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धेत सहभागाकरिता ७३५०५४४९०१, ९९२३५३७४३६, ७०८३७७४४१५ , ७३५०३४८४५८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading