Wednesday, August 5, 2026
Latest NewsPUNE

मंदार देवगावकर यांची डिईएस, पूणे विद्यापीठाच्या नियामक मंडळावर नियुक्ती

पुणे  : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे पुण्यातील उद्योजक मंदार देवगावकर यांची डेक्कन एजूकेशन सोसायटी, पुणे या विद्यापीठाच्या नियामक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना व विनियमन) अधिनियम २०२३ मधील कलम २७ मध्ये नियामक मंडळची तरतूद आहे, त्यानुसार सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

मंदार देवगावकर यांनी पुण्यातील प्रसिद्ध सी.ओ.ई.पी  अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हील इंजिनीअरींगची पदवी घेतल्यानंतर अमेरीकेतील टेक्सास विद्यापीठातून कन्स्ट्रक्शन इंजिनीअरींग – प्रकल्प व्यवस्थापन यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी फ्रान्सच्या ईन्सीड या संस्थेतून एम बी ए ची डिग्री घेतली.

देवगावकर यांचे शालेय शिक्षण पुण्यातील प्रसिद्ध ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतून झाले आहे. देवगावकर हे सध्या बांधकाम, रीअल इस्टेट,  हॉस्पिटॅलीटी, कोवर्किंग स्पेस या क्षेत्रात कार्यरत असून ज्येष्ठ नागरीकांसाठी असणाऱ्या निसर्गछाया संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात देखील सक्रीय आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading