Wednesday, August 5, 2026
BusinessLatest News

धूत ट्रान्समिशन लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग १० ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार

राष्ट्रीय : धूत ट्रान्समिशन लिमिटेड (‘कंपनी’) सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या इक्विटी शेअर्सचा इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (‘ऑफर’ आयपीओ) खुला करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख बिड/ऑफर उघडण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच  ७ ऑगस्ट २०२६ आहे. बिड/ऑफर बंद होण्याची तारीख बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ आहे.

या ऑफरची प्राईस बँड प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअर ८२९ रूपये ते ८७१ रूपयांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या किमान १७ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १७ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल. फ्लोअर प्राईस आणि कॅप प्राईस ही इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या अनुक्रमे ४१४.५० पट आणि ४३५.५० पट आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी सौम्यीकृत ईपीएसवर आधारित कंपनीचा प्राईस टू अर्निंग्स (‘पी/ई’) गुणोत्तर प्राईस बँडच्या निचल्या स्तरावर (म्हणजेच फ्लोअर प्राईस) ३३.९८ पट आणि प्राईस बँडच्या वरच्या स्तरावर (म्हणजेच कॅप प्राईस) ३५.७० पट आहे, तर उद्योगातील समान कंपन्यांच्या समूहाचे सरासरी पी/ई गुणोत्तर ५५.३१ पट आहे. कर्मचारी राखीव भागांतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर ८० रूपयांची सवलत दिली जात आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांतील निव्वळ मूल्यावरील भारित सरासरी परतावा २७.०६ टक्‍के आहे.

या ऑफरमध्ये १४०० कोटी रूपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू (‘फ्रेश इश्यू’) आणि काही विद्यमान भागधारकांद्वारे १,९१,३७,६०२ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) समाविष्ट आहे. यामध्ये बीसी एशिया इन्व्हेस्टमेंट्स एक्सव्ही लिमिटेड (‘प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर’) द्वारे प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १६,०१८,७६९ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा आणि मंगलम कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव मंगलम कॉईल्स प्रायव्हेट लिमिटेड) (‘प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर’, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डरसह संयुक्तपणे ‘सेलिंग शेअरहोल्डर्स’) द्वारे प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ३,११८,८३३ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

ही ऑफर सेबी आयसीडीआर नियमावलीच्या नियम ६(१) च्या पालनासह आणि नियम ३१ सह वाचल्या जाणाऱ्या एससीआरआरच्या नियम १९(२)(ब) नुसार ‘बुक बिल्डिंग प्रक्रिये’द्वारे केली जात आहे. यामध्ये निव्वळ ऑफरच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (‘क्यूआयबी’) (‘क्यूआयबी भाग’) प्रमाणबद्ध तत्त्वावर वाटप केला जाणार नाही. पण, आमची कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार स्वअधिकाराने क्यूआयबी भागातील ६० टक्‍क्‍यांपर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना (‘अँकर इन्व्हेस्टर भाग’) वाटप करू शकते. यातील ३३.३३ टक्‍के भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी आणि ६.६७ टक्‍के भाग जीवन विमा कंपन्या व पेन्शन फंडांसाठी राखीव असेल, जे अँकर इन्व्हेस्टर वाटप किंमतीवर किंवा त्याहून अधिक वैध बोली (बिड्स) प्राप्त होण्याच्या अधीन असेल. अँकर इन्व्हेस्टर भागामध्ये अपुरे सदस्यत्व किंवा बिगर-वाटप झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबी भागात (‘निव्वळ क्यूआयबी भाग’) जोडले जातील.

याव्यतिरिक्त, ऑफर किंमतीवर किंवा त्याहून अधिक वैध बोली प्राप्त होण्याच्या अधीन राहून, निव्वळ क्यूआयबी भागातील ५ टक्‍के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणबद्ध तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध असेल, आणि निव्वळ क्यूआयबी भागातील उर्वरित भाग म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना प्रमाणबद्ध तत्त्वावर वाटपासाठी उपलब्ध असेल. पण, म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी निव्वळ क्यूआयबी भागाच्या ५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स सर्व क्यूआयबींना प्रमाणबद्ध वाटपासाठी उर्वरित निव्वळ क्यूआयबी भागात जोडले जातील.

तसेच, सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार, ऑफर किंमतीवर किंवा त्याहून अधिक वैध बोली प्राप्त होण्याच्या अधीन राहून, निव्वळ ऑफरपैकी १५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी नाही इतका भाग गैर-संस्थात्मक बोलीदारांसाठी आणि ३५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी नाही इतका भाग किरकोळ वैयक्तिक बोलीदारांसाठी (‘आरआयबी’) वाटपासाठी उपलब्ध असेल. गैर-संस्थात्मक भागातील एक-तृतीयांश भाग ०.२० दशलक्ष रूपयांपेक्षा जास्त आणि १.०० दशलक्ष रूपयांपर्यंत बोली आकार असलेल्या गैर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असेल, तर दोन तृतीयांश भाग १.०० दशलक्ष रूपयांपेक्षा जास्त बोली आकार असलेल्या गैर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असेल; पण, सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार आणि ऑफर किंमतीवर किंवा त्याहून अधिक वैध बोली प्राप्त होण्याच्या अधीन राहून, गैर-संस्थात्मक भागाच्या या दोन उप-वर्गवाऱ्यांपैकी कोणत्याही एका वर्गात अपुरे सदस्यत्व असल्यास ते दुसऱ्या उप-वर्गातील गैर-संस्थात्मक बोलीदारांना वाटप केले जाऊ शकते.

तसेच, कर्मचारी राखीव भागांतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून ऑफर किंमतीवर किंवा त्याहून अधिक प्राप्त झालेल्या वैध बोलींच्या अधीन राहून, प्रमाणबद्ध तत्त्वावर इक्विटी शेअर्स वाटप केले जातील. सर्व संभाव्य बोलीदारांना (अँकर गुंतवणूकदार वगळून) अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (‘एएसबीए’) प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होणे अनिवार्य आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या संबंधित एएसबीए खात्यांचे तपशील आणि युपीआय बोलीदारांच्या बाबतीत योग्यतेनुसार युपीआय आयडी प्रदान करणे आवश्यक आहे. यानुसार त्यांची संबंधित बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (‘एससीएसबी’) किंवा युपीआय यंत्रणेअंतर्गत स्पॉन्सर बँकांकडून संबंधित बोलीच्या रकमेच्या मर्यादेपर्यंत ब्लॉक केली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना एएसबीए प्रक्रियेद्वारे या ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (‘बीएसई’) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (‘एनएससी’) वर सूचीबद्ध (लिस्ट) करण्याचे प्रस्तावित आहे. या ऑफरसाठी एनएससी हे नियुक्त स्टॉक एक्सचेंज असेल.

अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि ३६० वन वॅम लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading