Sunday, October 4, 2026
Latest NewsPUNE

“शास्त्रींजीं चे नेतृत्व ऊत्तरदायीत्वाची भावना जोपासणारे होते”….! – प्रशांत जगताप

पुणे : ‘जय जवान-जय किसान’चा नारा देत दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी बळीराजा व राष्ट्राच्या सीमा रक्षणाचे काम करणाऱ्या जवानांची प्रतिष्ठा वाढवली. सरकारी खर्चातून व्यक्तिगत सोई व लाभ घेणे ते टाळत होते पंतप्रधान पदा नंतर स्वतःचे घर ही नसलेले व साधी राहणी व उच्च विचारसरणी बाळगणारे लाल बहादूर शास्त्रीं चे नेतृत्व नैतिकतेची व ऊत्तरदायीत्वाची भावना जोपासणारे असल्याचे उदगार पुणे शहर (पुर्व विभाग) काँग्रेस चे अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांनी शास्त्री जयंती निमित्त पुष्पहार अर्पण प्रसंगी काढले.

नवी पेठेतील, शास्त्री रोड वरील ‘लाल बहादूर शास्त्री पुतळ्यास’ प्रशांतजी जगताप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, या प्रसंगी पुतळा समितीचे वतीने गोपाळदादा तिवारी यांनी त्यांचे व उपस्थिताचे स्वागत केले.
“राष्ट्रपिता महात्मा गांधी व शास्त्रींची जयंती एकाच दिवशी हा लोकशाही प्रधान देशास संदेश देणारा अभितपुर्व योगायोग असुन, महात्मा गांधींना अभिप्रेत जनकल्याणकारी राज्याची संकल्पना शास्त्रीजींच्या कार्यातुन सतत जाणवत असल्याचे उदगार” शा्स्त्री पुतळा समिती सदस्य व काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी काढले.

१९८९ साली, आपल्या वॅार्ढ मधुन जाणाऱ्या तत्कालीन (८० फुटी) एलबीएस रोड वर शास्त्रीं चा पुतळा बसवणे बाबत आपण पुढाकार घेऊन, सदरचा पुतळा शिल्पकार बी आर खेडकर यांचे कडुन बनवून, घेऊन तो आपण व बाळासाहेब देशमुख यांनी तत्कालीन महापौर ॲड अंकुश अण्णा काकडे (महापौर कारकिर्द संपण्यापुर्वी ३ दिवस) व नुतन महापौर बाळासाहेब राऊत यांचेकडे दि १२ मे १९८९ रोजी सुपुर्त केल्याचे पुतळा समिती संस्थापक सदस्य गोपाळदादा तिवारी यांनी या वेळी सांगितले.
पुणे मनपा’ने पुतळा जागेवरून न हलवता तेथेच नुतनीकरण केल्या बद्दल समाधान व्यक्त करून मनपा व संघर्ष करणाऱ्या मविआ कार्यकर्त्यांचे पुतळा समितीने धन्यवाद देऊन अभिनंदन केले.

या प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी हरीदास अडसुळ, योगेश भोकरे, ॲड विजय तिकोणे, आबा जगताप, राजेंद्र आलमखाने, अभिजीत महामुनी, शेखर पवार, गणेश ठोंबरे, अविनाश अडसुळ, शाम काळे, अनिल धिधिमे, दिलीप लोळगे इ कार्यकर्ते ऊपस्थित होते..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading