पुणे शहरात चौथ्या ‘ऐटेनेक्स् इंडिपेंडन्स् डे रन’ स्पर्धेचे १५ ऑगस्ट रोजी आयोजन !!
भारतातील आघाडीचे उद्योजक आणि चार वेळा जागतिक विजेतेपद पटकावणारे आदित्य गणेशवाडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी होणारी मॅरेथॉन ही पुण्यातील सामुदायिक धावण्याची चळवळ (कम्युनिटी रनिंग मूव्हमेंट) म्हणून ओळखली जाईल आणि या वर्षी या स्पर्धेत सुमारे ३ ते ५ हजार स्पर्धक सहभागी होतील, असा विश्वास आम्हाला आहे. या मॅरेथॉनचे नैतृत्व शहरातील क्रीडा क्षेत्रातील विजेते, संस्थापक आणि नागरी नेते करणार आहेत. यामध्ये हौशी तरूण, कॉर्पोरेट क्षेत्रातील संघ, कुटूंबे आणि जेष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांतील स्पर्धक सहभागी होतील. या स्पर्धेत ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी असे चार गट असणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात कोथरूड-कर्वेनगर येथील गांधी लॉन्स् येथून पहाटे ४ वाजता होणार आहे. आदित्य गणेशवाडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या धावण्याच्या स्पर्धेत उच्च दर्जाची क्रीडा कौशल्ये आणि उद्योजकीय नेतृत्वाचा संगम पाहायला मिळणार आहे.
या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेला दिग्गज आणि मानांकित मंडळींचा पाठींबा लाभला आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील चैन्नई सुपर किंग्ज् संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, आशियायी क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती आणि भारतातील अव्वल महिला टेनिसपटू ऋतुजा भोसले, अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबट्टीपटू शांताराम जाधव, आशियायी क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता स्केटर सिध्दांत कांबळे आदि मान्यवर एकत्र येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आणि ‘फ्लॅग ऑफ’ पुण्याचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक यांच्यासह पुण्यातील अनेक आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक पदकविजेते, क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित राहणार आहेत.
माजी भारतीय महिला कर्णधार वाहबिझ बरूचा, माजी पोलिस सहआयुक्त राजेंद्र भामरे, नगरसेवक निलेश कोंढाळकर, गोखले ग्रुपचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक विशाल गोखले, गोखल ग्रुपचे संचालक अर्चित गोखले, भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर, स्केटर आर्य जुवेकर, भारतीय बॅडमिंटनपटू पुर्वा बर्वे, महाराष्ट्राचे क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर आणि दिव्यांग हिंगणेकर, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सिनेअभिनेते क्षितीज दाते, अक्षय टांकसाळे आणि युट्युबर व इन्फ्लुएन्सर अथर्व सुदावे हे प्रमुख पाहूणे म्हणून उद्घाटन आणि पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थित राहणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला विशेष भेट मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी झाल्याचे प्रतीक म्हणून शर्यतीचा अधिकृत टी-शर्ट आणि शर्यत पूर्ण केल्याबद्दल पदक-‘फिनिशर मेडल’ देण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण चार गट असले तरी केवळ दोन गटांमध्ये ‘टाईम-बेस’ शर्यत होणार आहे. १० किमी आणि २१ किमी शर्यतींसाठी वेळेची नोंद होणार असून त्यांना अंतिम वेळेच्या नोंदीनुसार पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वाधिक २१ किलोमीटरच्या शर्यतीमधील विजेत्यांना ऐटेनेक्स् तर्फे ‘हिरो एक्स्ट्रीम १२५आर’ आणि ‘हिरो झूम १२५’ या मोटारसायकलींचे खास पारितोषिक मिळणार आहे.
ही केवळ दीर्घ अंतराच्या (२१ किमी) शर्यतीत भाग घेणाऱ्या धावपटूंसाठीच नाही तर, सर्व वयोगटांतील लोकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने आयोजित केली गेली आहे. सहभागी आणि हौशी स्पर्धकांसाठी ‘फन रन’ शर्यतसुध्दा होणार आहे. यांसह शर्यतीआधी आणि शर्यत पूर्ण झाल्यानंतरही आरोग्य आणि फिटनेस संबंधीत विविध उपक्रम, जेष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटांसाठी झुंबा व्यायामचे सत्र होणार आहे.
१५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशासाठी भावपूर्ण असतो आणि या ‘ऐटेनेक्स् इंडिपेंडन्स् डे रन’ मध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना अभिमानाचे कृतीत रूपांतर करण्याची संधी देत आहे. ७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाची सुरूवात ‘फिटनेसव्दारे स्वातंत्र्य’ या स्पर्धेच्या मुख्य उद्दीष्ट्यासह करण्यात येणार असून यामध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी होऊ शकणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी स्वतःच्या आरोग्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण केल्याचे समाधान देऊ शकणार आहे. ही केवळ व्यावसायिक खेळाडूंपुरती मर्यादित न ठेवता पुण्यातील प्रत्येक नागरिकांसाठी असणार आहे, असे आदित्य गणेशवाडे यांनी सांगितले.
‘ऐटेनेक्स् इंडिपेंडन्स् डे मॅरेथॉन’ ही नैतृत्वाचा अधिकार मिळवलेल्या लोकांचा मेळावा आहे. विविध क्षेत्रातील विजेते, निर्माते आणि आपल्या कष्टांव्दारे स्वातंत्र्य साजरे करणारे नागरिक अशा सर्व लोकांचा सहभाग यामध्ये असणारे आहेत. या मॅरेथॉनच्या पहिल्या मौसमामध्ये ५०० धावपटू होते आणि आता हिच संख्या हजारो धावपटूंपर्यंत वाढलेली आहे आणि हेच या उपक्रमाने कमावलेला विश्वास दर्शविते. पुण्याच्या महत्वाकांक्षेचे सर्वोत्तम प्रतिक म्हणून या मॅरेथॉनचा उल्लेख व्हावा, अशी आमची ईच्छा असल्याचे संस्थापक-विजेता आदित्य गणेशवाडे यांनी व्यक्त केली.
गतवर्षी तिसऱ्या आवृतीच्या मॅरेथॉनचे उद्घाटन भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि यामध्ये सुमारे साडेतीन हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. तेव्हापासून आत्ताची ही आवृत्ती केवळ शर्यत न राहता, एकत्र वाटचाल करणाऱ्या आणि भारताला अग्रक्रम मिळवून देणाऱ्या लोकांचे प्रतिबिंब ठरणार आहे.
या मॅरेथॉनच्या नोंदणीसाठी townscript.com/e/atenx-
या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच नावनोंदणी आणि अधिक माहीतीसाठी अथर्व कर्णिक (९४०३०४०३१७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
