Saturday, July 25, 2026
Latest NewsPUNE

‘रायव्हल्स’तर्फे पुण्यातून ‘कॉलेज रायव्हल्स सीझन ४’ ची केली सुरुवात

पुणे : ‘ॲम्पव्हर्स डीएमआय’चा गेमिंग आणि एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म ”रायव्हल्स’ आता व्यावसायिक ई-स्पोर्ट्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात मोठा विस्तार करत आहे. या विस्ताराचा भाग म्हणून रायव्हल्सने ‘प्रो रायव्हल्स’ या नव्या राष्ट्रीय ई-स्पोर्ट्स स्पर्धेची घोषणा केली आहे. यासोबतच ‘कॉलेज रायव्हल्स’चा आतापर्यंतचा सर्वात मोठा चौथा सीझनही सुरू झाला आहे.

‘प्रो रायव्हल्स’ची पहिली आवृत्ती १७ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित केली जात आहे. सहा फेऱ्यांच्या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास १,००० संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत एकूण ७ लाख रुपयांची बक्षीस रक्कम ठेवली आहे; ज्यामध्ये विजेत्या संघाला ३ लाख रुपये, उपविजेत्याला २ लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघाला १ लाख रुपये दिले जातील. तसेच, ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’  आणि ‘फॅन फेव्हरेट’ यांना वैयक्तिक पुरस्कार दिले जातील आणि प्रत्येक विजेत्याला ५०,००० रुपये मिळतील. पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेची सांगता भारताच्या आघाडीच्या संघांमधील ‘प्रो रायव्हल्स’ चॅम्पियनशिपचे पहिले विजेतेपद मिळवण्यासाठीच्या अंतिम लढतीने होईल.

ॲम्पव्हर्सचे सह-संस्थापक आणि ग्रुप सीईओ, चार्ली बेली म्हणाले, “‘प्रो रायव्हल्स’हे ‘रायव्हल्स’ प्लॅटफॉर्मच्या उत्क्रांतीमधील पुढचे पाऊल आहे. गेमिंग समुदाय जसजसे प्रगल्भ होत आहेत, तसतसे खेळाडू उच्च स्तरावर स्पर्धा करण्याच्या आणि अधिक सक्षम प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध स्वतःला आव्हान देण्याच्या संधी शोधत आहेत. ‘प्रो रायव्हल्स’च्या माध्यमातून आम्ही ‘रायव्हल्स’चा अनुभव कॅम्पसच्या पलीकडे नेत आहोत. आम्ही स्पर्धात्मक खेळासाठी एक नवीन व्यासपीठ तयार केले आहे, जे ‘कॉलेज रायव्हल्स’ला पूरक ठरेल आणि संपूर्ण ‘रायव्हल्स’ इको सिस्टीमला बळकट करेल.”

‘कॉलेज रायव्हल्स सीझन ४’ ने पुण्यातून आपल्या देशव्यापी प्रवासाची सुरुवात केली आहे, ज्यामुळे विद्यार्थी आणि गेमिंगचे एक प्रमुख केंद्र म्हणून या शहराचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अजिंक्य डी. वाय. पाटील, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ((व्हीआयआयटी),  एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एनएमआयईटी पुणे, डी.वाय.पाटील वराळे, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सिंहगड एसबीएनएसटीएस आणि डी.वाय.पाटील आकुर्डी अशा १० नामांकित महाविद्यालयांमध्ये हा पुणे टप्पा दोन आठवड्यांत राबविला जाईल. त्यानंतर हा उपक्रम देशभरातील ४० हून अधिक शहरांमधील १०० हून अधिक महाविद्यालयांच्या कॅम्पसपर्यंत विस्तारला जाईल.

विद्यार्थी बीजीएमआय सोलो,जीएमआय फीमेल, जीएमआय स्क्वाड आणि ईए स्पोर्ट्स एफसी मोबाइल या स्पर्धांमध्ये भाग घेतील, तसेच ‘रायव्हल्स आर्केड’ द्वारे कम्युनिटी गेमिंगचा अनुभव घेतील. चौथ्या पर्वामध्ये काही निवडक कॅम्पसवर स्पर्धात्मक प्रकार म्हणून बुद्धिबळाचा देखील समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे या प्लॅटफॉर्मच्या गेमिंग पोर्टफोलिओचा विस्तार होईल आणि विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी नवीन संधी निर्माण होतील.

ॲम्पव्हर्स डीएमआय च्या इंडिया बिझनेस हेड, सुमेधा महाजन म्हणाल्या, “पुणे ही नेहमीच आमच्यासाठी सर्वात मजबूत बाजारपेठांपैकी एक राहिली आहे. येथे अत्यंत उत्साही विद्यार्थी समुदाय आहे आणि गेल्या तीन सीझन्समध्ये सातत्याने प्रचंड सहभाग दिसून आला आहे. त्यामुळे ‘कॉलेज रायव्हल्स सीझन ४’  ची सुरुवात येथून करणे ही आमच्यासाठी स्वाभाविक बाब होती. शैक्षणिक उत्कृष्टता आणि बहरलेली युवा संस्कृती यांचा संगम असलेले शहर म्हणून, पुणे ‘कॉलेज रायव्हल्स’ च्या मूळ उद्देशाचे उत्तम प्रतिनिधित्व करते. या सीझनमध्ये, आम्ही अधिक कॅम्पसपर्यंत पोहोचून, नवीन स्पर्धात्मक प्रकार सादर करून आणि गेमिंग, मनोरंजन व युवा संस्कृतीशी जोडले जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक समृद्ध संधी उपलब्ध करून देऊन हा अनुभव एका नव्या उंचीवर नेत आहोत. यासोबतच, ‘प्रो रिव्हल्स’ हा उपक्रम ‘रिव्हल्स’ इकोसिस्टमचा कॅम्पसच्या पलीकडे विस्तार करतो आणि इच्छुक खेळाडूंना व्यावसायिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.”

भारतातील मोबाइल गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स बाजारपेठेचे मूल्य २०२५ मध्ये १.१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके असल्याचा अंदाज होता आणि २०२९ पर्यंत ते २.४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या क्षेत्रातील सहभाग जसजसा वाढत आहे, तसतसे या उद्योगाच्या विकासाच्या पुढील टप्प्याला आकार देण्यात सुनियोजित स्पर्धा आणि समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म्सची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading