‘सबका मालिक एक’ च्या जयघोषात शिर्डीत घडणार कावेरीला अद्भुत गुरुरूपाचे दर्शन!
कलर्स मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय आणि श्रद्धास्थानाचे प्रतीक बनलेली मालिका *’जय जय स्वामी समर्थ’*मध्ये सध्या भक्तीचा एक अलौकिक सोहळा पाहायला मिळत आहे. जुलै महिना हा गुरुदर्शनाचा महिना मानला जातो आणि याच निमित्ताने या मालिकेत एक अत्यंत दिव्य आणि चमत्कारी वळण आले आहे. अक्कलकोटच्या दिशेने निघालेल्या कावेरीची वाट स्वामींच्या लीलेने बदलते आणि ती थेट शिर्डीत पोहोचते. तिथे तिला साक्षात साईबाबांच्या रूपात स्वामींचे दिव्य दर्शन घडणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना एका अद्वितीय आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या गुरुदर्शनाचा अनुभव घेता येईल. शिर्डीत कावेरीला घडणार गुरुरूपाचे दिव्य दर्शन. पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ दररोज रात्री ८.१० वाजता आपल्या कलर्स मराठीवर.
या विशेष भागात शिर्डीतील पवित्र द्वारकामाईमध्ये भल्या पहाटेच्या मंगलमय वातावरणात, धूनीसमोर बसलेले साईबाबा कावेरीला दिसणार आहेत. यावेळी एक विलक्षण आणि अंगावर काटा आणणारी लीला घडते. स्वामी धूनीतील जळते लाकूड कावेरीच्या हातावर ठेवतात, मात्र तिच्या हाताला इजा न होता तिथे दिव्य प्रकाशात गुरुमंत्राचे ‘द्रां’ हे अक्षर उमटते. तिला शिर्डीत घेऊन आलेला तरुण साक्षात बाबांमध्ये विलीन होतो आणि स्वामी अन् साईबाबांचे रूप एकरूप होऊन ‘सबका मालिक एक’ हा मंत्र घुमतो.
अक्कलकोटवरून ती शिर्डीत कशी पोहोचली यावर बाबा तिचे सांत्वन करत, “मी माझ्या चिमणीच्या पायात दोरी बांधून तिला ओढून घेतो,” या वचनाची आठवण करून देतात. या अलौकिक दर्शनानंतर स्वामी कावेरीकडे झोळीतून एक चिठ्ठी काढून देतात आणि एक मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवतात. त्या चिठ्ठीद्वारे स्वामींनी कावेरीवर कोणती जबाबदारी सोपवली? कावेरी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकेल का? गुरुमंत्र कधी पूर्ण होणार? हे पाहणे आता कमालीचे रंजक ठरणार आहे.
भक्ती आणि गुरुलीलेचा हा थक्क करणारा अद्भुत प्रवास अनुभवण्यासाठी नक्की पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ दररोज रात्री ८.१० वाजता आपल्या कलर्स मराठीवर.
