Thursday, July 16, 2026
BusinessLatest News

झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस लिमिटेडला आयपीओसाठी सेबीकडून मिळाली मंजुरी

लिंक: https://www.sebi.gov.in/filings/processing-status/jul-2026/processing-status-issues_96940.html

तंत्रज्ञानाधारित उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) प्लॅटफॉर्म असलेल्या झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस लिमिटेडला प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)कडून मंजुरी मिळाली आहे.

या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) विद्यमान समभागधारकांकडून फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल समाविष्ट असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांमध्ये खोसला व्हेंचर्स, बेली गिफर्ड, राकेश गंगवाल, अॅक्सेल, पीक XV, ग्रीनओक आणि लाइटस्पीड यांचा समावेश आहे.

अमृत आचार्य आणि श्रीनाथ रामकृष्णन यांनी 2018 मध्ये स्थापन केलेली ही कंपनी तंत्रज्ञान-सक्षम उत्पादन प्लॅटफॉर्मचे संचालन करते. हा प्लॅटफॉर्म औद्योगिक मागणी आणि वितरित पुरवठादार तसेच उत्पादन सुविधांच्या नेटवर्कला जोडतो. कंपनीचा व्यवसाय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, एरोस्पेस आणि भांडवली वस्तू (Capital Goods) यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेला असून औद्योगिक पुरवठा आणि कच्च्या मालाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्लॅटफॉर्मचाही त्यात समावेश आहे. स्वतःच्या मालकीच्या उत्पादन सुविधांसह जागतिक स्तरावरील विस्तृत थर्ड पार्टी पुरवठादार नेटवर्कच्या माध्यमातून झेटवर्कने आपल्या कामकाजाचा विस्तार केला आहे. कंपनी आपल्या मालकीच्या झेटवर्क ओएस (Zetwerk OS) या सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करून सोर्सिंग, उत्पादन नियोजन, पुरवठादार समन्वय आणि संपूर्ण नेटवर्कमधील प्रकल्प अंमलबजावणीचे व्यवस्थापन करते.

जागतिक पुरवठा साखळीतील बदलांमुळे वाढती गती अनुभवणाऱ्या क्षेत्रांमध्ये कंपनी कार्यरत आहे. यामध्ये चीनपलीकडे पुरवठा साखळीतील वैविध्य, डेटा सेंटर आणि पायाभूत सुविधा उभारणीतील वाढती गुंतवणूक तसेच ऊर्जा संक्रमण आणि औद्योगिक क्षमतांशी संबंधित वाढती मागणी यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी संरक्षण उत्पादन आणि भारतातील देशांतर्गत उत्पादनाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्येही सहभागी आहे.

क्रिसिलच्या अहवालानुसार, समूहाला 1,000 हून अधिक ग्राहकांचा मजबूत ग्राहकवर्ग लाभला असून त्यामध्ये एनटीपीसी रिन्यूएबल्स एनर्जी लिमिटेड, नेक्सट्रॅकर, सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड, आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया आदी प्रतिष्ठित कंपन्यांचा समावेश आहे. स्थानिक बाजारपेठा आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समूह सध्या अमेरिका, आग्नेय आशिया तसेच मध्य पूर्व/आफ्रिका येथे कार्यरत आहे. भारतभर पसरलेल्या 5,000 हून अधिक सक्रिय पुरवठादार/विक्रेत्यांशी समूहाने मजबूत भागीदारी प्रस्थापित केली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणातील उपलब्ध उत्पादन क्षमता, विविध प्रकारची कौशल्ये आणि स्पर्धात्मक वाजवी किंमतींच्या माध्यमातून ग्राहकांच्या मोठ्या ऑर्डर्सची पूर्तता करणे समूहाला शक्य होते. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, मार्च 2026 पर्यंत समूहाकडे 12000 कोटी रु. पेक्षा अधिक मूल्याची ऑर्डर बुक असून त्याची अंमलबजावणी पुढील 12-18 महिन्यांत केली जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading