प्रा. डॉ. राहुल कराड यांना पहिला ‘विठू माऊली पुरस्कार २०२६’ प्रदान!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शताब्दी वर्षानिमित्त ‘परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाचा’ स्तुत्य उपक्रम
पुणे : परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार साहित्यिक कट्ट्याच्या वतीने आयोजित पहिल्या ‘वारकरी कवी-काव्य संमेलन २०२६’ निमित्त एम आय टी पीस युनिव्हर्सिटीचे उपाध्यक्ष व युवा छात्र संसदचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा. डॉ. राहुल कराड सरांना पहिला ‘विठू माऊली पुरस्कार २०२६’ देऊन गौरवण्यात आले. “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शताब्दी २०२७” वर्षाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ अभ्यासू नेते गोपाळदादा तिवारी आणि ज्येष्ठ पत्रकार व युएनआयचे पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चीफ प्रकाशजी पांडे यांच्या हस्ते डॉ. कराड सरांचा हा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष सागवेकर, एम आय टी पीस युनिव्हर्सिटीचे प्रसिद्धी प्रमुख संजय कैकाडे, ज्येष्ठ महिला पत्रकार मंजुषा आवळकंठे, उत्तमराव मांढरे, पत्रकार प्रशांत निकम आणि स्वप्निल कोठावदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. राहुल कराड यांनी आयोजकांचे आभार मानले असून, समाजमन जोडणाऱ्या वारकरी साहित्य परंपरेचा हा सन्मान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या सोहळ्यामुळे साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
