Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

विषारी दारूकांडाचा तपास सीआयडीकडे; निष्काळजीपणाबद्दल 22 अधिकाऱ्यांवर कारवाई

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात घडलेल्या विषारी दारूकांडाच्या गंभीर पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर दोन्ही विभागाच्या 22 अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात अवैधरित्या तयार करण्यात आलेल्या दारूमध्ये मिथेनॉल मिसळण्यात आल्याचे समोर आले असून, त्यातून अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तपास यंत्रणांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अवैध दारू विक्री व पुरवठा साखळीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांना निलंबित केले आहे. तसेच तपास पथकाच्या प्रमुखांसह आणखी चार पोलिस अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे. विषारी दारूकांडातील दोषींना शिक्षा आणि संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading