Saturday, June 13, 2026
BusinessLatest News

एसकेएफने टीसीएसला सोपवले जागतिक स्तरावरील व्यवसायात एआय-चालित परिवर्तनाचे कॉन्ट्रॅक्ट

गोटेनबर्ग : आयटी सेवा, सल्ला आणि व्यवसाय उपाययोजना पुरवणारी, जागतिक स्तरावर आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने एसकेएफसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या सहकार्याचा उद्देश एसकेएफच्या जागतिक कामकाजात इंटेलिजंट परिवर्तन घडवून आणण्याला गती देणे हा आहे. या सहकार्याद्वारे, टीसीएस औद्योगिक उत्पादन व्यवसायात आमूलाग्र बदल करण्यासाठी एआयचा वापर करून एसकेएफला भविष्यासाठी सज्ज डिजिटल व्यवसाय उभारण्यास सक्षम करेल.

या सहकार्यांतर्गत, टीसीएस एसकेएफसाठी जगभरातील ॲप्लिकेशन्स, पायाभूत सुविधा, डेटा, युजरला मिळणाऱ्या सेवा, सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थापित सेवा प्रदान करेल. आपला सखोल उत्पादन आणि आयटी अनुभव एआयच्या शक्तीवर चालणाऱ्या एजेंटिक वर्कफ्लोसोबत जोडून, ​​टीसीएस आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान प्रणालीचे आधुनिकीकरण करून त्यामध्ये सुलभता आणेल. हा कार्यक्रम कार्यप्रणालीचे मानकीकरण करेल, डोमेन आधारित तंत्रज्ञान आर्किटेक्चर मजबूत करेल, मुख्य पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करेल आणि पुढील पिढीच्या एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग प्लॅटफॉर्मच्या डिझाइन व स्वीकृतीला गती देईल.

एसकेएफचे सीईओ, रिकार्ड गुस्ताफसन म्हणाले: “औद्योगिक उत्पादनाचे पुढील दशक एकाच गोष्टीवर अवलंबून असेल: कंपन्या त्यांच्या डिझाइन, उत्पादन आणि सेवेमध्ये एआयला किती सखोलपणे समाविष्ट करतात. एसकेएफ या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. टीसीएससोबत सहयोग करून, आम्ही केवळ आमच्या तंत्रज्ञानाची पुनर्रचना करत नाही, तर एक मजबूत एआय पाया तयार करत आहोत जो संपूर्ण उद्योगात अचूकता आणि ग्राहक मूल्यासाठी नवीन मापदंड स्थापित करेल. ही दोन कंपन्यांमधील एक दीर्घकालीन वचनबद्धता आहे, ज्यांचा उत्पादन क्षेत्राच्या भविष्यासाठी आणि पुढील दिशेसाठी दृष्टिकोन एक समान आहे.”

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे एमडी आणि सीईओ, के. कृतिवासन म्हणाले: “एसकेएफसोबतच्या आमच्या भागीदारीचा मुख्य उद्देश त्यांच्या जागतिक आयटी प्रणालीचे आधुनिकीकरण करणे आणि भविष्यासाठी एक मजबूत, विस्तारक्षम डिजिटल पाया तयार करणे हा आहे. आम्ही एकत्रितपणे डेटा आणि एआयच्या सामर्थ्याचा उपयोग करून एक अशी सक्षम कंपनी तयार करत आहोत, जी तांत्रिक आणि बाजारातील बदलांशी जुळवून घेऊ शकेल, तसेच दीर्घकालीन वाढ आणि बाजारातील लवचिकता वाढवेल. हे सहकार्य एसकेएफला एआय-नेटिव्ह आणि उद्योगातील आघाडीची, तंत्रज्ञान-अग्रणी उत्पादक कंपनी बनवण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे द्योतक आहे. टीसीएस आपल्या सखोल डोमेन कौशल्याद्वारे, प्रगत तंत्रज्ञानाद्वारे आणि मजबूत सहकार्य प्रणालीद्वारे संपूर्ण मूल्य साखळीमध्ये अभूतपूर्व आणि परिणाम-केंद्रित व्यावसायिक परिवर्तनाला चालना देईल.”

 

ही भागीदारी एसकेएफला जागतिक स्तरावर जोडलेले ऑपरेटिंग मॉडेल तयार करण्यास मदत करेल, जे केंद्रीकृत आणि एआय सक्षम प्रणालींना एकसमान प्रक्रियांमध्ये एकत्रित करेल आणि स्थानिक बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्ण लवचिकता प्रदान करेल. हे मॉडेल एसकेएफला आयटी, व्यवसाय आणि उत्पादनांच्या प्रत्येक स्तरावर एआयचा समावेश करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे विकासाला गती मिळेल, ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळेल आणि जागतिक व प्रादेशिक दोन्ही स्तरांवर धोरणात्मक प्राधान्यक्रम पुढे नेले जातील.

टीसीएसचा फुलस्टॅक एआय दृष्टिकोन (पायाभूत सुविधांपासून ते बुद्धिमत्तेपर्यंत) आणि त्यांच्या अत्याधुनिक नवोन्मेष इकोसिस्टिमचे लाभ मिळाल्यामुळे एसकेएफला एक अनुरूप ऑपरेटिंग वातावरण तयार करण्यास मदत होईल. हे वातावरण संपूर्ण औद्योगिक मूल्य साखळीमध्ये व्यवसाय परिवर्तन उपक्रमांना चालना देईल, ज्यामुळे ग्राहक-केंद्रितता आणि बाजारपेठेतील वेगळेपण सुलभ होईल.

एसकेएफसोबतची ही नवीन भागीदारी नॉर्डिक प्रदेशात टीसीएसचे मजबूत अस्तित्व आणखी बळकट करते, जिथे ते १९९१ पासून कार्यरत आहे. सध्या, टीसीएसमध्ये २०,००० हून अधिक कर्मचारी स्वीडन, फिनलंड, नॉर्वे आणि डेन्मार्कमधील आघाडीच्या कंपन्यांना साहाय्य करत आहेत, ज्यामुळे या प्रदेशातील अनेक मोठ्या कॉर्पोरेशन्सना वाढण्यास आणि परिवर्तन करण्यास मदत होत आहे. स्टॉकहोम, गोटेबर्ग आणि माल्मो येथे कार्यालये असून, टीसीएस गेल्या तीस वर्षांहून अधिक काळापासून स्वीडनमध्ये एक मजबूत अस्तित्व टिकवून आहे. स्टॉकहोममधील टीसीएस पेस स्टुडिओ™ (TCS Pace Studio™) ग्राहकांना कंपनीच्या जागतिक नवोन्मेष इकोसिस्टिमचे विशेष लाभ प्रदान करतो. स्वतंत्र ‘टॉप एम्प्लॉयर्स इन्स्टिट्यूट’ने टीसीएसला सलग चौदा वर्षे युरोपमधील ‘सर्वोत्कृष्ट एम्प्लॉयर’ म्हणून स्थान दिले आहे आणि २०२६ मध्ये स्वीडनमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आहे.

व्हाइटलेन रिसर्चच्या एका स्वतंत्र सर्वेक्षणानुसार, टीसीएसने एका दशकाहून अधिक काळ मोठ्या युरोपियन कंपन्यांमध्ये ग्राहक समाधानाच्या बाबतीत सातत्याने अव्वल आयटी सेवा प्रदात्यांमध्ये स्थान मिळवले आहे आणि २०२६ मध्ये स्वीडनमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आहे. टीसीएस स्वीडिश समुदायाशीही खोलवर जोडलेले आहे आणि जगातील सर्वात मोठी क्रॉस-कंट्री धावण्याची शर्यत असलेल्या ‘TCS Lidingöloppet’चे टायटल स्पॉन्सर आणि तंत्रज्ञान भागीदार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading