यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल होणार
पुणे प्रतिनिधी
राज्यात सध्या उन्हाळा तीव्र होत असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
मात्र, मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्यासाठी सध्या दक्षिण बंगालच्या उपसागरात तसेच अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेट येथे अनुकूल स्थिती निर्माण झाली असून मोसमी पाऊस या आठवड्याच्या अखेरीस या प्रदेशात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा काहीसे कमी राहण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली गेली आहे. मात्र, अल निनोचा प्रभाव जुलै महिन्यात दिसणार असून जून महिन्यात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
