Saturday, April 25, 2026
BusinessLatest News

महिंद्राच्या शेती उपकरण व्यवसायाची देशांतर्गत बाजारपेठेत 35% ची जोरदार वाढ

मुंबई : महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसने (FEB) फेब्रुवारी 2026 मधील ट्रॅक्टर विक्रीची   आकडेवारी आज जाहीर केली.

फेब्रुवारी 2006 मध्ये देशांतर्गत विक्री 32,153 युनिट्स एवढी होती. फेब्रुवारी 2025मध्ये हाच आकडा 23,880 एवढा होता. वार्षिक 35% वाढ नोंदवत फेब्रुवारी 2026 मधील विक्रीमध्ये वाढ झाली आहे.

फेब्रुवारी 2026मध्ये एकूण 34,133 ट्रॅक्टरची विक्री (देशांतर्गत + निर्यात) झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही विक्री 25,527 युनिट्स एवढी होती. 20% वाढ नोंदवत या महिन्यातील निर्यात 1,980 युनिट्स एवढी होती.

या कामगिरीबद्दल महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेती उपकरण व्यवसायाचे अध्यक्ष विजय नाक्रा म्हणाले, “गेल्या वर्षीच्या तुलनेत 35% ची वाढ नोंदवत फेब्रुवारी 2026मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत आम्ही 32,153 ट्रॅक्टर विकले आहेत. रब्बी पेरणीत जोरदार वाढ, चांगली जलाशय पातळी, अनुकूल खरीप पीक यामुळे ग्रामीण बाजारपेठेतील रोख प्रवाह वाढला आहे. नवरात्रासह या महिन्यातील ही सकारात्मक भावना ट्रॅक्टरची मागणी वाढविण्यास मदत करेल. निर्यात बाजारपेठेतही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असून आम्ही 1,980 ट्रॅक्टर विकले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 20% वाढ नोंदवण्यात आली आहे.”

शेती उपकरण क्षेत्राचा आढावा
  फेब्रुवारी YTD फेब्रुवारी
  F26 F25 बदल F26 F25 बदल
             
देशांतर्गत 32153 23880 35% 462527 374512 24%
             
निर्यात 1980 1647 20% 18841 15195 24%
             
एकूण 34133 25527 34% 481368 389707 24%

*निर्यातीमध्ये सीकेडीचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading