Saturday, September 26, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मदतीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार; सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघे ताब्यात

वर्धा : मदतीच्या बहाण्याने एका तरुणीला रेल्वे स्थानकाबाहेर नेऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यात समोर आला आहे. या प्रकरणी वर्धा लोहमार्ग पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २३ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली. आरोपींनी मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीला रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून चार संशयितांना ताब्यात घेतले. यातील एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जात आहे.
लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी वर्ध्यात भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास वर्धा लोहमार्ग पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading