Saturday, April 18, 2026
Latest NewsPUNE

श्री जे आणि युनायटेड प्रिंटर्सचे संचालक रवीन्द्र जोशी यांचे निधन

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध मुद्रण संस्था म्हणून ओळख असणाऱ्या श्री जे  आणि युनायटेड प्रिंटर्सचे संचालक रवीन्द्र जोशी यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई श्रीमती माधवी, पत्नी रूपा, कन्या सौ. राधा, थोरले बंधू डॉ. राजीव व धाकटे बंधू चंद्रशेखर असा परिवार आहे.

जोशी यांचा जन्म ११ जानेवारी १९६३ रोजी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण नूमवि मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज तसेच आयएलएस विधी महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. मुद्रण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनमध्ये त्यांनी अध्यक्ष आणि सचिव म्हणून काम पाहिले. तसेच ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स या संस्थेत दोन वेळा अध्यक्ष, तसेच खजिनदार आणि सचिव म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे या संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत झाली.

मुद्रण व्यवसाय आणि शिक्षण यांचा परस्परसंबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. नव्याने उद्योगात येणाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आणि तांत्रिक सेमिनार आयोजित करून त्यांनी मार्गदर्शन केले. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत उद्योगाच्या प्रगतीसाठी त्याचा प्रभावी वापर करण्यावर त्यांचा भर होताव्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे आणि प्रभावी संवादकौशल्यामुळे ते सर्वत्र ‘रवीभाऊ’ म्हणून परिचित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading