Saturday, April 18, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी

 

पुणे – प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा आणि अस्वछता यांनी बुरसटलेल्या समाजाला जागृत करण्याचे कार्य करणारे थोर आधुनिक संत व समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सरस्वती सभागृहात प्र – कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव तथा वित्त व लेखाधिकारी सीएमए (डॉ.) चारुशीला गायके यांनी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी प्रा. डॉ. वर्षा वानखेडे, उपकुलसचिव डॉ. प्रदीप कोळी, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच याप्रसंगी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading