‘लायन्स् प्रीमियर लीग’ २०२६ खुला गट टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे २२ फेब्रुवारीपासून आयोजन !!
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना लायन्स् क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ स्पोर्ट्स चेअरपर्सन ला. श्रीनाथ खैरे यांनी सांगितले की, पांढऱ्या चेंडूवर साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. खुल्या गटातील ७० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत. स्पर्धेला रूद्र मोटर्स यांनी प्रायोजक्तव देण्यात आले आहे. स्पर्धेचे सामने हे दिवस-रात्र अशा पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत.
रूद्र वॉरीयर्स, साची सुपरकिंग्ज्, भाऊ कोकणे क्लब, नायर ईगल्स् आणि योगेश वीक्टर्स या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन रविवार, २२ फेब्रुवारी रोजी (आज) लायन्स् क्लबचे डिस्ट्रीक्ट ३२३४डी२ चे गव्हनर्र ला. राजेशजी अगरवाल, रूद्र मोटर्सचे संतोष माने, वाईस डिस्ट्रीक्ट गव्हनर्र श्रेयस दिक्षीत, वाईस डिस्ट्रीक्ट गव्हनर्र २ राजेंद्र गोयल, कॅबिनेट अधिकारी रविद्र गोलार आणि लायन्स् क्लब पुणे रहाटणीचे संस्थापक वसंतभाऊ कोकणे यांच्या हस्ते होणार आहे. नायर ईगल्स् आणि भाऊ कोकणे क्लब या दोन संघांमध्ये उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
विजेत्या संघाला करंडक तर, उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, फायटर्स ऑफ द मॅच याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
