Wednesday, April 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जागतिक स्तरावर भारताची बदनामी करण्याचे काँग्रेसचे सुनियोजित षडयंत्र

 

भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र

‘एआय समिट’मधील युवक काँग्रेसचे आंदोलन म्हणजे आंतराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युवक काँग्रेसचे एआय समिट मधील कपडे काढण्याचे आंदोलन लाजिरवाणे होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावली जात आहे. देशाची प्रगती आणि वाढती ताकद यामुळे अस्वस्थ असलेल्या काँग्रेस ने लांछनास्पद कृत्य केल्याचेही श्री. बन यांनी नमूद केले.

यावेळी श्री. बन म्हणाले की, काँग्रेसच्या या देशविरोधी कृत्याचा निषेध करण्यासाठी काल भाजयुमो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि आजही राहुल गांधी भिवंडी कोर्टात जात असताना भाजयुमो कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. देश विरोधी अजेंडा राबवणा-या काँग्रेसला आगामी काळात जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा ही त्यांनी दिला.

 

युवा पिढी पंतप्रधान मोदींच्या पाठीशी

मतदारांनी काँग्रेसला वारंवार नाकारल्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतून राहुल गांधी देशात अस्वस्थता, अराजक माजवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. आधीही भारतातील युवा पिढी (जेन झी) नेपाळसारखे अराजक भारतात माजवेल असे लाजिरवाणे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते याची आठवण करून देत आत्ताच्या युवक काँग्रेसच्या आंदोलनावरून राहुल यांना श्री. बन यांनी खडे बोल सुनावले. भारतातील युवा पिढी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे, काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी काहीही फरक पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जामीनावर बाहेर असलेले नेते देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महात्मा गांधी हत्या यांचा सूतराम संबंध नसताना राहुल गांधी संघावर बिनबुडाचे आरोप करतात. याबद्दल सुप्रीम कोर्टाने स्पष्टता दिली आहे, तत्कालीन काँग्रेस सरकारने स्पष्टता दिली असताना देखील राहुल बरळत आहेत अशी टीका श्री. बन यांनी केली. संघाची आणि देशाची बदनामी करणे हा काँग्रेसचा आवडता उद्योग झाला आहे. जामीनावर बाहेर असलेले नेते देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत असा टोला त्यांनी जामीनावर बाहेर असलेल्या राहुल, सोनिया, हर्षवर्धन सपकाळ यांना मारला.

संजय राऊतांना रोज नाक घासून माफी मागायला लागेल

दादा भुसे यांच्यावर कथित घोटाळ्याचे बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी राऊतांवर मालेगाव कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला सुरू आहे. त्या प्रकरणात राऊतांना मालेगाव कोर्टात जाऊन नाक घासायला लागणार आहे . पुराव्याविना खोटे आरोप केल्यावरून अशा पद्धतीने राऊतांना मालेगाव कोर्टातच नाही तर रोज नाक घासून माफी मागायला लागणार आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली.

राज्यसभा निवडणुकीत उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असले तरी संजय राऊत यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आदित्य ठाकरेंच्या मताला काडीची किंमत नाही हेही यावेळी सिद्ध होईल असे टीकास्त्र श्री. बन यांनी सोडले. आदित्य ठाकरे यांना आपला अजेंडा आणि पसंतीचे नाव बाजूला ठेवावे लागेल आणि राऊत यांनी पुढे केलेल्या शरद पवारांच्या नावावर संमती दर्शवायला लागेल. राऊतांची टर्म संपल्यानंतर ते पुढच्या वेळेला काँग्रेसकडून राज्यसभेचे उमेदवार असतील, हे लिहून घ्या असा टोमणा त्यांनी मारला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading