Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थ्यांनी केली शिवगर्जना

 

पिंपरी : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी ढोल – ताशांच्या गजरात शिवगर्जना केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी धैर्य, न्याय, नेतृत्व आणि मातृभूमीप्रेम यांचे महत्त्व जाणून घेतले. तसेच पोवाडे, नृत्य सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, प्राचार्य शीतल मोरे, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, नीलम पवार, इशिता परमार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, सीमा हवालदार, प्रीती पाटील यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे शौर्य, नेतृत्वगुण, दूरदृष्टी आणि उत्तम प्रशासन यावर प्रेरणादायी विचार व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेविषयी आणि ऐतिहासिक किल्ल्यांविषयी माहिती सांगितली. तसेच शिवरायांचे गीत सादर केले. राजा शिवछत्रपती हे नाटक सादर केले. त्याचबरोबर शिवरायांची शिवस्तुती सादर केली. त्यामुळे शाळेतील वातावरण शिवमय झाले होते.
आरती राव यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचा गनिमीकावा, युद्धतंत्र, अष्टप्रधान मंडळ, शिवराज्याभिषेक याबाबत माहिती सांगितली. प्रणव राव यांनी हिंदवी स्वराज्य निर्मिती करताना शिवरायांनी मावळ्यांना केलेले उपदेश, शेतीव्यवस्था याबाबत माहिती दिली. शिक्षिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांना शिवरायांच्या विविध गुणांविषयी माहिती सांगून त्यातील एक तरी गुण आपण आत्मसात केला पाहिजे, असे आवाहन केले.
शिवजयंतीचे औचित्य साधून घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. ‘हर ~ हर महादेव’च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading