JioHotstar भारतात चॅटजीपीटी-ब्रँडेड संवादात्मक स्ट्रीमिंग सेवा सुरू केली
पुणे : गेल्या दशकभरात डिजिटल मनोरंजन हा एकमार्गी अनुभव राहिला आहे — तुम्ही ब्राउझ करता, क्लिक करता आणि पाहता. आज जिओहॉटस्टार आणि ओपनएआय यांनी महत्त्वपूर्ण धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगांतर्गत भारतातील सर्वात मोठ्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्ममध्ये चॅटजीपीटी-सक्षम व्हॉइस डिस्कव्हरी आणि इमर्सिव्ह अनुभव टप्प्याटप्प्याने समाविष्ट केला जाणार आहे, ज्यामुळे स्ट्रिमिंगचा अनुभव मानवी भाषेतील संवादात रूपांतरित होईल.
या सहयोगाद्वारे जिओहॉटस्टार “काय पाहावे?” या नेहमीच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मल्टीलिंग्वल कॉग्निटिव्ह सर्च सादर करत आहे. यामुळे सतत स्क्रोल करण्याचा त्रास दूर होऊन मानवी संवादाच्या माध्यमातून अर्थपूर्णपणे शोध घेता येईल.
भारतासाठी पहिल्यांदाच सादर होणाऱ्या या अभिनव उपक्रमांतर्गत प्रेक्षक आता विविध भाषा, प्रकार आणि प्रसंगांमध्ये फक्त बोलून आपल्या आवडत्या कथांचा शोध घेऊ शकतील, त्यांच्याशी संवाद साधू शकतील आणि त्या अनुभवात अधिक खोलवर सहभागी होऊ शकतील. यामुळे स्ट्रीमिंगचा अनुभव आता फक्त पाहण्यापुरता मर्यादित न राहता सहज आणि अत्यंत वैयक्तिक संवाद बनेल.
आता मेनूमध्ये शोध घेण्याऐवजी किंवा कीवर्ड्स टाइप करण्याऐवजी प्रेक्षक फक्त त्यांचा हेतू, मूड किंवा संदर्भ बोलून व्यक्त करू शकतात आणि त्यांना तत्काळ बुद्धिमान, संदर्भ समजून घेणाऱ्या शिफारसी मिळू शकतात. चॅटजीपीटी-ब्रँडेड व्हॉइस असिस्टंटने पारंपरिक आणि मर्यादित कीवर्ड-आधारित शोध पद्धती पूर्णपणे बदलली आहे. हे तंत्रज्ञान केवळ प्रेक्षकांनी स्पष्टपणे विचारलेल्या गोष्टींसाठीच नव्हे, तर त्यांना अजून शोधायचे आहे हेही लक्षात न आलेल्या कंटेंटसाठी शिफारसी देऊ शकते, ज्यामुळे मनोरंजनाचा अनुभव अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण होतो.
या सहयोगाविषयी बोलताना जिओस्टारचे व्हाइस चेअरमन उदय शंकर म्हणाले, “एआय मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रासाठी क्रांतिकारी बदल ठरत आहे. संकल्पना आणि निर्मितीपासून ते शोध आणि कमाईपर्यंत, हे तंत्रज्ञान प्रत्येक टप्प्यावर मुलभूत बदल घडवून आणत आहे. तंत्रज्ञान-केंद्रित आणि वापरकर्त्याला प्राधान्य देणारे व्यासपीठ म्हणून जिओस्टार वापरकर्त्यांच्या अनुभवाच्या केंद्रस्थानी एआयला स्थान देत आहे. ओपनएआयसोबत आमच्या सहयोगामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवाजाचा वापर करून मजकूर शोधता येईल, त्यात सहभागी होता येईल आणि इतकेच नव्हे तर स्वतःच्या आवडीनुसार कंटेंटची मांडणी करता येईल. मनोरंजन क्षेत्राच्या अनुभवाची ही एक मुलभूत पुनर्कल्पना आहे, जी भविष्यातील कल ओळखणारी आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी अत्यंत वैयक्तिक वाटणारी असेल.”
ओपनएआयमधील अॅप्लीकेशन्स विभागाच्या सीईओ फिडजी सिमो म्हणाल्या, “परंपरेने मनोरंजन हा एकमार्गी अनुभव राहिला आहे, जिथे प्रेक्षक फक्त निष्क्रियपणे कंटेंट पाहतात, एआय ही संपूर्ण कार्यपद्धती बदलून टाकत आहे. जिओहॉटस्टारसोबत आमच्या सहयोगाद्वारे आम्ही वैयक्तिकृत एआय थेट मनोरंजन आणि लाईव्ह स्पोर्ट्समध्ये आणत आहोत, ज्यामुळे प्रत्येक क्षण अधिक सखोल सहभागाची संधी बनतो. प्रेक्षक पाहण्यापासून प्रश्न विचारण्याकडे, कुतूहलापासून संदर्भ समजून घेण्याकडे आणि शोधापासून शिफारसीपर्यंत सहजपणे प्रवास करू शकतात आणि हे सर्व इतके नैसर्गिक, वैयक्तिक आणि उपयुक्त वाटेल की जणू ते त्यांच्या दैनंदिन संवादाचाच एक भाग आहे.”
जर वापरकर्ता म्हणाला, “माझे आई-वडील भेटायला येत आहेत, आम्ही सगळे मिळून पाहू शकू असे काही सुचवा,” किंवा “आम्ही जुळी भावंडे आहोत आणि आम्ही फक्त जुळ्या भावंडांवर आधारित चित्रपटच पाहतो,” तर हा बुद्धिमान सहाय्यक सांस्कृतिक सूक्ष्मता, परिस्थितीचा संदर्भ आणि बहुस्तरीय सूचनांचा अर्थ समजून घेऊन अर्थपूर्ण शिफारसी देतो. वापरकर्ते जिओहॉटस्टारवरील लाईव्ह स्पोर्ट्सचा अनुभवही अधिक समृद्ध करू शकतील. महत्त्वाचे क्षण, स्कोअर, खेळाडूंची ठळक कामगिरी आणि त्यांना जाणून घ्यायचे असलेले इतर तपशील संवादाच्या माध्यमातून शोधता येतील.
ही सेवा लाईव्ह आणि ऑन-डिमांड अशा दोन्ही स्वरूपांत टप्प्याटप्प्याने सादर केली जाणार आहे. सुरुवात निवडक अनुभवांपासून होईल आणि पुढील टप्प्यांमध्ये विस्तार करण्यात येईल.
अॅपमधील अनुभवापलीकडे जाऊन, जिओहॉटस्टार आणि ओपनएआय चॅटजीपीटीमध्ये देखील नवीन अनुभव सादर करणार आहेत, ज्यामुळे मनोरंजन शोधाची व्याप्ती जिओहॉटस्टारच्या बाहेरही वाढेल. जे वापरकर्ते मनोरंजनाशी संबंधित प्रश्नांसाठी चॅटजीपीटीचा वापर करतील, त्यांना संदर्भानुरूप शिफारसी आणि जिओहॉटस्टारच्या विस्तृत कॅटलॉगमधील संबंधित स्ट्रिमिंग दुवे मिळतील. यामुळे हा सहयोग खऱ्या अर्थाने द्विमार्गी एकत्रीकरण ठरेल.
मोठ्या प्रमाणावर स्ट्रिमिंगमध्ये एआय समाविष्ट करून जिओहॉटस्टार डिजिटल मनोरंजनातील पुढील टप्प्याची दिशा निश्चित करत आहे. ओपनएआयच्या प्रगत एआय मॉडेल्सच्या सहाय्याने सादर होणारा हा नवीन संवादाधारित शोध अनुभव स्ट्रिमिंगला अधिक बुद्धिमान, संदर्भाला अनुरूप आणि वैयक्तिक अनुभवात रूपांतरित करतो आणि उद्योगासाठी नवा मापदंड स्थापित करतो.
भारतामधील स्ट्रिमिंग क्षेत्र अधिक परिपक्व होत असताना वापरकर्त्यांच्या हेतू आणि संदर्भ रिअल-टाइममध्ये समजून घेणारी बुद्धिमत्ता हीच या क्षेत्रातील फरकाचा मुख्य घटक ठरेल. एआय-आधारित वैयक्तिकरण आणि मोठ्या प्रमाणावर बहुभाषिक संवाद सक्षम करून जिओहॉटस्टार अधिक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्यासह प्रेक्षकांना त्यांचा मनोरंजनाचा प्रवास स्वतःच्या आवडीनुसार घडवण्यासाठी अधिक सक्षम केले जात आहे.
