Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

२४ फेब्रुवारीला उलगडणार ‘राममंदिर… कथा मंदिर उभारणीची’

पुणे : संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीची कथा पुणेकरांसमोर उलगडली जाणार आहे. निमित्त आहे साकेत फाउंडेशन आणि अमोल  रावेतकर यांच्या वतीने येत्या मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सायं ६.३० वाजता एरंडवणे, डी. पी. रस्ता येथील गोल्डन लीफ बँक्वेट हॉल (शुभारंभ लॉन्स शेजारी) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राममंदिर… कथा मंदिर उभारणीची’ या कार्यक्रमाचे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमस्थळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.

कार्यक्रमा दरम्यान राम मंदिर उभारणीच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत बांधकामाची पूर्ण जबाबदारी सांभाळणारे मुख्य अभियंता जगदीश आफळे हे ‘राममंदिर उभारणी दरम्यानचे आपले प्रत्यक्ष अनुभव कथन आणि काही बाबींचे सादरीकरण यावेळी पुणेकरांसमोर करणार आहेत. याबरोबरच श्री राम मंदिर भक्तीदान सेवा योजनेच्या माधुरी आफळे यादेखील उपस्थितांना मंदिराच्या निमित्ताने होणाऱ्या अर्थकारणाची माहिती देतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading