Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

टिपू सुलतान बाबत भाजपने आपल्याच पूर्वीच्या भूमिका तपासाव्या

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका

नवी दिल्ली  : टिपू सुलतानाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेच्या विरोधात भाजपने रान उठवले असले तरी त्यांनीच यापूर्वी टिपू सुलतानबाबत काय भूमिका घेतली होती, हे तपासावे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.

यापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकात जाऊन टिपू सुलतान वर गौरवाची फुले उधळली होती. भाजप सत्तेत असलेल्या अनेक महापालिकांमध्ये टिपू सुलतान च्या नावाने अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले होते, त्याच भाजपने आता कांगावा सुरू केला आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

भाजपला काही काम धदा नाही. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे हिंदू मुसलमान यांना झुंजवण्याचे काम भाजप करत आहे. सध्या राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत. मग कशाला उगाच तोंडाला फेस आणता, असा सवाल राऊत यांनी केला.

भाजपने कधी सर्वसामान्य नागरिकांच्या, कष्टकरी, विद्यार्थी, गोरगरीब यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केलेले नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे सांगायला भाजपची गरज नाही. इतिहासात नोंदवल्या गेलेल्या गोष्टी भाजप बदलू शकत नाही. त्यामुळे टिपू सुलतान च्या विषयावरून भाजपने हा बैल मुझे मार, असे करू नये, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading