महापौर मंजुषा नागपुरे व उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा ‘विकसित पुणे’चा निर्धार
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणेकरांनी भारतीय जनता पक्षावर दाखवलेला अभूतपूर्व विश्वास हा केवळ राजकीय विजय नसून, पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाची ठाम सुरुवात असल्याचे मत नवनिर्वाचित महापौर मा. सौ. मंजुषाताई दीपक नागपुरे यांनी व्यक्त केले.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पुणे शहराचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती बाप्पा यांच्या चरणी विधिवत व मनोभावे आरती करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित महापौर मा. सौ. मंजुषाताई दीपक नागपुरे व उपमहापौर मा. श्री. परशुरामजी वाडेकर प्रमुख उपस्थित होते. पुणे महानगरपालिका सभागृहात जाण्यापूर्वी पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘विकसित पुणे’ या संकल्पनेची प्रतीकात्मक विजयी गुढी उभारून शंखनाद करण्यात आला.
महापौर व उपमहापौर यांच्या हस्ते गुढीचे विधिवत पूजन करून पुणे शहराच्या विकासाचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला. विकास, सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिककेंद्रित धोरणांच्या माध्यमातून पुण्याला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पावन व ऐतिहासिक कार्यक्रमास कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. हेमंतजी रासने, पुणे भाजपा शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे, पुणे महानगरपालिका भाजपा गटनेते श्री. गणेशजी बिडकर, भाजपा नेते श्री. श्रीनाथ भिमाले यांच्यासह नगरसेवक बापू मानकर, विशाल धनवडे, कुणाल टिळक, स्वरदा बापट, ऐश्वर्या थोरात, उज्वला यादव तसेच विविध पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. दुष्यंत मोहोळ यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. “ही गुढी उभारणी केवळ परंपरेचा भाग नसून, पुणे शहराला विकास, सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिककेंद्रित धोरणांच्या माध्यमातून नव्या उंचीवर नेण्याचा सामूहिक निर्धार आहे. पुणेकरांनी भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता, महापौरांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित पुणे – समृद्ध पुणे’ घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष श्री. दुष्यंत मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे प्रतीक कुंजीर, प्रणव गंजीवाले, योगेश खाटपे, करण देसाई, योगेश जगताप, पंकज गित्ते, प्राजक्ता जोशी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
