महापौर निवडीनंतर महापालिकेत लिफ्ट दुर्घटना
काही नगरसेवक, नागरिक व पत्रकार किरकोळ जखमी
मालेगाव :
महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर अभिनंदनासाठी हजारो नागरिकांची गर्दी जमली असतानाच महापालिका भवनातील लिफ्ट कोसळून त्यातील काही नगरसेवक, नागरिक आणि पत्रकार किरकोळ जखमी झाले.
महापौर निवडणूक पार पडल्यानंतर अभिनंदन करण्यासाठी महापालिका भवनात नगरसेवक आणि पत्रकारांसह हजारो नागरिकांची मोठी गर्दी जमली. या ठिकाणी वातावरण मोठे आनंदाचे आणि उत्साही होते.
निवडणूक पार पडल्यानंतर सभागृहातून बाहेर पडून खाली येण्यासाठी अनेक जण लिफ्ट मध्ये शिरले. त्यामध्ये नगरसेवक, नागरिक आणि पत्रकारांचा समावेश होता.
लिफ्ट मधील लोकांची संख्या तिच्या क्षमतेपेक्षा अधिक झाली. त्यामुळे लिफ्ट खाली येत असताना मोठा आवाज करून लिफ्टच्या तारा तुटल्या आणि लिफ्ट दाणकन खाली कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही गंभीर इजा झालेली नाही.
