Sunday, June 14, 2026
BusinessLatest News

बजाज लाइफ इन्‍शुरन्‍स पेंशन फंड मॅनेजर आणि गिफ्ट सिटी परवान्‍यांसाठी अर्ज करणार

पुणे बजाज लाइफ इन्‍शुरन्‍स या भारतातील आघाडीच्‍या खाजगी जीवन विमा कंपनीने घोषणा केली की¸ त्‍यांच्‍या संचालक मंडळाने गिफ्ट सिटीगांधीनगर येथे पेंशन फंड मॅनेजमेंट कंपनी आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सर्विसेस सेंटर (आयएफएससी) इन्‍शुरन्‍स ऑफिस (आयआयओ) स्‍थापन करण्‍यासाठी मंजूरी दिली आहे. कंपनीची सर्वसमावेशक आर्थिक सोल्यूशन्‍स प्रदान करण्‍याची क्षमता वाढवण्‍यासाठी हे धोरणात्‍मक विस्‍तारीकरण करण्‍यात आले आहेजेथे विशेषत: भारतातील निवृत्तीवेतनामधील तफावत दूर करण्‍यावर आणि जगभरातील भारतीयांसाठी विम्‍याचे मार्ग उपलब्‍ध करून देण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल.

फंड व्‍यवस्‍थापनामधील २० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आणि १.३ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक प्रबळ अॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) यांचा फायदा घेत बजाज लाइफ इन्‍शुरन्‍स उपकंपनीच्‍या माध्‍यमातून एनपीएस सदस्‍यांसाठी पेंशन फंड मॅनेजमेंट सेवा सुरू करण्‍याकरिता आवश्‍यक नियामक मंजूरी मिळवेल. ही मंजूरी मिळवत कंपनीचा प्रीमियम अॅन्‍युइटी प्रदातावरून एण्‍ड-टू-एण्‍ड रिटायरमेंट सोल्‍यूशन्‍स आर्किटेक्‍ट बनण्‍याचा मनसुबा आहेजेथे सर्व सामाजिक-आर्थिक स्‍तरांमधील नागरिकांसाठी नाविन्‍यपूर्ण पेंशन उत्‍पादने उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेण्‍यात येईल. 

तसेचकंपनी गिफ्ट सिटीमध्‍ये आपली उपस्थिती दर्शवण्‍यासाठी पुढाकार घेत आहे. यासंदर्भात बजाज लाइफ इन्‍शुरन्‍स इंटरनॅशनल फायनान्शियल सर्विसेस सेंटर्स ऑथोरिटी (आयएफएससीए)इन्‍शुरन्‍स रेग्‍युलेटरी डेव्‍हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) आणि गिफ्ट सेझ यांच्‍याशी समन्‍वय साधत आवश्‍यक मान्‍यता मिळवेल. हा उपक्रम जगभरातील भारतीय नागरिक व अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) डिझाइन करण्‍यात आला आहेजे मालमत्ता निर्मिती आणि जीवन विमा गरजांसाठी जागतिक संधींचा शोध घेत आहेत. गिफ्ट सिटीमधील कार्यसंचालनांमुळे ग्राहकांना परकीय चलनात उपलब्‍ध असलेल्‍या जीवन विमा उत्‍पादनांमध्‍ये गुंतवणूक करता येईलज्‍यासह त्‍यांच्‍या जीवनातील विविध गरजांची व ध्‍येयांची पूर्तता करता येईल.

या विकासाबाबत मत व्‍यक्‍त करत बजाज लाइफ इन्‍शुरन्‍सचे एमडी व सीईओ तरूण चुघ म्‍हणाले, ”पीएफआरडीएआयएफएससीए, आयआरडीएआय आणि गिफ्ट सेझ यांच्‍याकडून मान्‍यता मिळवण्‍यासाठी संचालक मंडळाची मिळालेली मंजूरी लाइफ गोल्‍सना अधिक सर्वसमावेशक करण्‍याप्रती आमच्‍या प्रवासामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात समर्पित पेंशन उपाययोजनांची मोठी गरज आहे आणि पीएफम कंपनी आम्‍हाला एनपीएस व निवृत्ती उत्‍पादनांची परिपूर्ण श्रेणी देण्‍यास सक्षम करेल. तसेचगिफ्ट सिटी आम्‍हाला जगभरातील भारतीय समुदायांना बजाज लाइफला नव्‍या उंचीवर घेऊन जाणारा तोच विश्वास व नाविन्‍यतेसह सेवा देण्‍याची संधी देते. आम्‍ही ग्राहकांसाठी या विशेषीकृत क्षमता आणण्‍याकरिता नियामकांसोबत सहयोगाने काम करण्‍यास उत्‍सुक आहोत.

हे विस्‍तारीकरण बजाज लाइफ इन्‍शुरन्‍सची कस्‍टमर फर्स्‍ट तत्त्वाप्रती कटिबद्धता अधिक दृढ करतेतसेच खात्री देते की कंपनीच्‍या उपाययोजना सर्वसमावेशकवैयक्तिकृत आणि आधुनिक काळातील ग्राहकांच्‍या प्रवासाशी संबंधित राहतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading